गुरुजीचा प्रामाणीकपणा : सापडलेले सत्तर हजार रुपये व्यवसाईकाला केले परत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

गुरुजीचा प्रामाणीकपणा : सापडलेले सत्तर हजार रुपये व्यवसाईकाला केले परत

 गुरुजीचा प्रामाणीकपणा : सापडलेले सत्तर हजार रुपये व्यवसाईकाला केले परत


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः निंबळक नागापूर रस्त्यावर  सापडलेले सत्तर हजार रुपये येथील प्राथमिक शिक्षक दादा घोलप यांनी खारेकर्जुने येथील हॉटेल व्यवसाईक गंगाधर लांडे याना प्रामाणीकपणे दिले.
   खारेकर्जुने (ता. नगर ) येथील हॉटेल व्यवसाईक यांनी स्वतःचे  वाहन सत्तर हजार रुपायाला विकले नागापूर .नागापूर  निंबळक परीसरामध्ये हे पैसे त्यांच्या बॅग मधून खाली पडले. रस्ता खराब असल्यामुळे बॅग पडलेली लक्षात आली नाही.या रस्त्यावरुन जात असलेले ब्राम्हणी येथे नोकरीस असलेले प्राथमिक शिक्षक दादा घोलप, बंडू भोर यांना ते सापडले. पैसे हरवल्याचे लक्षात येतातच लांडे यांनी या परीसरात शोध सुरू केला माञ पैसे सापडले नाही. गंगाधर लांडे यांची ही बॅग असल्याचे घोलप यांना समजले. त्यांनी नोटांचा तपशील व विचारून खातरजमा करून त्यांची रक्कम प्रामाणीकपणे परत केली.  लांडे यानी घोलप यांना रोख बक्षिस दिले मात्र त्यांनी नाकारले. या प्रामाणीकपणामुळे राहुरी येथील गट शिक्षण अधिकारी, उंबरे येथील मुख्यध्यापक, विस्तार अधिकारी व शिक्षकांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment