फेज 2 चे काम करणार्‍या ठेकेदाराकडून 14 कोटी वसुल कारा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 30, 2021

फेज 2 चे काम करणार्‍या ठेकेदाराकडून 14 कोटी वसुल कारा.

 फेज 2 चे काम करणार्‍या ठेकेदाराकडून 14 कोटी वसुल कारा.

जलवाहिनी दुरुस्ती करीता दरवर्षी, 50 लाख रूपये खर्च हा मोठा घोटाळा!

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अहमदनगर शहरातील जलवाहिनी देखभाल दुरूस्ती साठी दरवर्षी जवळपास 50 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते ही कामे करतांना दुरुस्तीच्या कामाची निविदा काढणे गरजेचे असताना देखिल पाणीपुरवठा विभागामार्फत निविदा न काढता 5हजार रुपये किंव्हा त्याच्या आतील कोटेशन करुण बिले काढली जातात. व हे काम करणारे ठेकेारांकडे कुठल्याही प्रकारचे महानगर पालिकेचे रजिस्ट्रेशन नाही, जी. एस टी. नंबर नाही ई. पी. एफ. नंबर नाही आशा प्रकारे अनधिकृत माणसांकडून अनधिकृत पध्दतीने पाणीपुरवठा विभागातील अधिकारी काम करुण घेतात. वर्षाला 50 हजारांच्या आत्ताच बिगर निविदा काढता काम करता येते हा नियम असताना देखिल महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत जवळपास 50 लाख रुपयांची दुरुस्तीची कामे बिगर निविदा का काढली जातात असा प्रश्न मनसे सचिव नितीन भुतारे यांनी उपस्थीत केला आहे. ही बाब दरवर्षी ऑडिट रिपोर्ट मधुन ऑडिटर मार्फत निदर्शनास येते परंतू महानगर पालिकेचे आयुक्त व ईतर अधिकारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे दरवर्षी 50 लाख रुपयांच्या दुरुस्तीच्या कामात भ्रष्टाचार होतो हे दिसून येते. दहा वर्षांपासून फेज 2 चे काम पूर्ण न झाल्यामुळे 10 वर्षांपासून महानगरपालिकेला जवळ्पास दुरुस्तीचा खर्च 5 कोटी व टँकर द्वारे पाणी पुरवठ्यासाठी 9 कोटी रुपये या दहा वर्षात करावा लागला आहे हे सर्व पैसा जनतेचा असुन फेज 2 चे काम आजपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे हा महानगर पालिकेचा खर्च झालेला आहे.  फेज 2 च्या कामास विलंब झाल्यामुळे या 2010 ते 2021पर्यंत दुरुस्ती व टँकर वर झालेला 14 कोटी रूपये फेज 2 ठेकेदाराकडून वसुल करावे तसेच पाणीपुरवठा देखभाल दुरूस्ती च्या कामात भ्रष्टाचार करणार्‍यावर कारवाई करावी तसेच या अर्थ संकल्पात पाणीपुरवठा दुरूस्ती करीता 50 लाखाची आर्थिक तरतूद न करता हा खर्च फेज 2 चे काम करणार्‍या ठेकेरकडून करुण घ्यावा आशा मागण्यांचे निवेदन मनसेचे नितीन भुतारे यांनी महानगर पालिका आयुक्तांना दिले आहे. सदर प्रकरणावर चौकशी करुण आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना  सर्व पुराव्यानिशी न्यायालयात दाद मागणार असा ईशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment