‘सकल मराठा सोयरीक डॉट कॉम’चे संकेतस्थळ, आता विवाहेच्छुकांचे नातेवाईक! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 13, 2021

‘सकल मराठा सोयरीक डॉट कॉम’चे संकेतस्थळ, आता विवाहेच्छुकांचे नातेवाईक!

 ‘सकल मराठा सोयरीक डॉट कॉम’चे संकेतस्थळ, आता विवाहेच्छुकांचे नातेवाईक!

जुनी मोडकळीस आल्याने नवीन व्यवस्था
  सकल मराठा सोयरिक ग्रुपचे समन्वयक जयकिसन वाघपाटील म्हणाले की, फक्त अतिउच्च आर्थिक वर्गात जातीचा विचार केला जात नाही. इतर मात्र, प्रेमविवाह झाले तरी जवळच्या वाटणार्‍या जातीतील मुला-मुलींची मध्येच होताना दिसतात. आजही भारतीय आईवडील आपल्या उपवर मुला-मुलींना स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याची समज नाही अशाच धारणेत आहेत.पूर्वीची व्यवस्था मोडकळीस आली असल्याने वधू वर सूचक मंडळाची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नातलगाच्या घरी लग्नसोहळा असो, दिवाळी-उन्हाळ्याच्या सुट्या असो; प्रत्येकजण आवर्जून जायचा. समारंभात दिसणारी चुणचुणीत मुलगी, मुलगा पाहण्यात यायचा आणि मग वयात आल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांकडे विचारणा व्हायची. कधी गावात किंवा नातेवाइकांकडे पाहण्यात आलेल्या मुला-मुलीविषयी पाहुणेरावळे स्थळ सुचवायचे. मात्र, आधुनिक काळात नातेवाइकांकडे जाणे-येणे कमी झाले. मुला-मुलींची स्थळे जमवायची वेळ आल्यानंतर कुठे शोध घ्यायचा, असा प्रश्न निर्माण होऊ लागला. म्हणून दिवसागणिक वधू-वर सूचक मंडळांची संख्या वाढत आहे. आता नातेवाइकांची स्थळ सुचविण्याची भूमिका सकल मराठा सोयरीक डॉट कॉम हे संकेतस्थळच पार पाडत आहेत.
   पूर्वी भाट, जातपंचायती, नातीगोती आणि माणसाच्या भोवती आजुबाजूला पंचक्रोशीतील गोतावळ्याचा वेडा असायचा. भटांना प्रत्येक व्यक्तीची वंशावळी माहिती असायची. गावोगाव भटकंती करणारे भाटही स्थळे सुचवायचे. तर काही नाती काही भागांमध्ये लग्नासाठी विधी मान्य होती. मामाची मुलगी किंवा मुलगा असे नातेसंबंध लग्नासाठी जाहीर धरले जायचे. मात्र, दिवसेंदिवस एकत्रित कुटुंब संस्था कमी होऊन व्यक्त कुटुंबाची संख्या वाढत आहे. नोकरीच्या निमित्ताने स्थलांतरे वाढली, आर्थिक संपन्नता आली. रेट रेस मुळे नातेवाईकांच्या भेटी गाठी होणे कमी होत आहे. यामुळे मुलांना आई-वडिलांचे नातेवाईक म्हणजे आजी-आजोबा, मामा,मावशी आणि वडिलांकडील आत्या आणि चुलते यांच्या पलीकडे नातेवाईकांची ओळखही राहिली नाही. माणूस एकटा होत चाललाय. अस्पृश्यता आता कुठे पाळली जाते असे जरी म्हणत असले, तरी जात लग्न आणि मरण या दोन ठिकाणी हमखास जाणवते.ज्यावेळी उपवर मुला-मुलींचे लग्न जमा होण्याची वेळ येते त्यावेळी मग आपल्या लाडक्या लेकीसाठी किंवा लेकासाठी सुयोग्य जोडीदार निवडण्यासाठी सध्या वधु-वरांना सकल मराठा सोयरीक डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी ग्रृपकडे धाव घ्यावी लागत आहे.सन 2014 पासून सुरु करण्यात आलेल्या सकल मराठा सोयरीक  व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून सकल मराठा समाजासाठी राबविण्यात येणार्या निःशुल्क उपक्रमात 2 हजार 810 लग्न जुळली आहेत.महाराष्ट्रसह गुजरात, राजस्थान,गोवा,मध्यप्रदेश आणि विदेशातील मराठा समाजातील उपवर वधुंचा विवाह झाला आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून वधूवरांच्या बायोडाटाविषयाची माहिती या ग्रुपवर सहज उपलब्ध होते. या उपक्रमातून 3 हजार 400 वधु वरांच्या जन्मगाठी जुळून त्यांचे कुटुंब जवळ आले आहे. वधु संशोधान किंवा वर संशोधनाचा वेळ, पैसा व श्रम या नव्या उपक्रमामुळे वाचतात.सकल मराठा सोयरीक  व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधत पसंतीचे कार्यक्रम भावी वधु-वरांनी उरकून घेतले. या ग्रुपची स्थापना झाल्यापासून उपवर वधू -वरांची नोंदणी विनामूल्य करण्यात येते. हा उपक्रम सुरु करण्यात सकल मराठा सोयरीक ग्रृप चे संस्थापक ,समन्वयक जयकिसन वाघपाटील  यांचा मोलाचा वाटा आहे. वधू- वरांचे फोटो, ग्रुप वाढविणे, बायोडाटा, एडिटिंग, ऑनलाईन वधूवर परिचय वेबिनारचे आयोजनही सकल मराठा सोयरीक  व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकून सेवा दिली जात आहे. यामध्ये 45 वधू-वर परिचय मेळावे यशस्वी झाले असून 2 मेळावे आनलाईन पद्धतीने झाले. सकल मराठा सोयरीक ग्रृप च्या माध्यमातून विधवा पुर्नरविवाह,दुर्दैवाने काही अपघाताने घटोस्पोटीत झालेल्या वधु-वरांचे लग्न जमविण्यासाठी प्रवृत्त करुन अनेक लग्न जमविण्यासाठी प्रयत्न केले आहे .लग्नानंतर समज -गैरसमजुतीतून भांडण अथवा वादविवाद झाले तर वाद न्यायालयात न जाता त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी सकल मराठा सोयरीक  तंटा निवारण समिती कार्य करीत आहे. त्यातही या समितीला चांगले यश मिळाले आहे.
   सध्या कोरोना संसर्गाच्या काळामधील लॉकडाऊनमुळे लग्नाची गोष्टही थांबलेली होती. या काळात सकल मराठा सोयरीक डॉट कॉम ने या ‘व्हिडिओ कॉलिंग’च्या माध्यमातून घेतलेल्या ऑनलाईन मेळाव्यांमध्ये ‘पसंती’ झालेली असली तरी निर्णय मात्र प्रत्यक्ष ‘कांदेपोहे’ कार्यक्रमानंतरच होईल, असा कल असल्यामुळे नव वधूवरांना अंशत: असणारा लॉकडाऊन पूर्ण संपण्याचीच वाट पहावी लागणार आहे.
   लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी ज्यांचे विवाह जुळले, ते पार पडले आहेत. मात्र, त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. गेल्या काही महिन्यांत शहरातल्या काही वधू-वर सूचक मंडळांची प्रत्यक्ष नोंदणी थांबली आहे. ऑनलाइन नोंदणी आणि विवाहेच्छुकांचे ऑनलाइन मेळावे पार पडताना दिसत आहेत. या मेळाव्यात सहभागी होऊन एकमेकांच्या अपेक्षांवर चर्चा होत असून, प्राथमिक पसंतीही सकल मराठा सोयरीक डॉट कॉम च्या माध्यमातून होत आहे. पण, प्रत्यक्ष भेटूनच आणि घरातील मंडळींचा होकार आल्यावर लग्नाची बोलणी करायची, असे चित्र सध्या वधु-वर व पालकांच्या मनात दिसत आहे. ऑनलाइन मेळाव्याला प्रतिसाद चांगला असला तरी प्रत्यक्ष विवाहाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय हा अंशतः असणारा लॉकडाऊन उठल्यानंतरच होईल, असं दिसत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here