बुर्‍हाणनगर गावात ड्रेनेज कामांना प्राधान्य ः कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

बुर्‍हाणनगर गावात ड्रेनेज कामांना प्राधान्य ः कर्डिले

 बुर्‍हाणनगर गावात ड्रेनेज कामांना प्राधान्य ः कर्डिले

ग्रामपंचायत निधीतून बंद गटार पाईप कामाचा शुभारंभ

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः स्वच्छ भारत सुंदर भारत संकल्पना प्रत्यक्षात कशी साकारायची हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: धडे दिले. त्याला सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे. बुर्‍हाणनगर गावात देखील सार्वजनिक स्वच्छतेला महत्व देत ड्रेनेजच्या कामांना प्राधान्य दिले, असे प्रतिपादन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले आहे.
बुर्‍हाणनगर ग्रामपंचायत निधीतून ब्राह्मणचाळ येथे बंद गटार पाईप कामाचा शुभारंभ अक्षय कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास सरपंच रावसाहेब कर्डिले, उपसरपंच जालिंदर कदम, दत्ता तापकिरे, ग्रा.पं.सदस्य स्वाती कर्डिले, मंगल कर्डिले, शितल धाडगे, मंदा साळवे, वृषाली तापकिरे, सुनिता तरवडे, सरस्वती कर्डिले, राजेंद्र पाखरे, सोमनाथ तापकिरे, शरद कर्डिले, भाऊसाहेब कर्डिले आदि उपस्थित होते.
   अक्षय कर्डिले पुढे म्हणाले,बुर्‍हाणनगर ग्रामपंचायत हद्दीत उपनगराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सरपंच असतांना रस्ते, वीज, पाणी प्रश्न सोडविले होते. आमदार झाल्यावर नगर, राहुरी, पाथर्डी तालुक्यांचा विकास केला, त्यामुळेच आजही सर्वसामान्य जनता त्यांच्यामागे खंबीरपणे उभी आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी आपआपल्या भागात कामे सुरु केली. सध्या ड्रेनेजचा प्रश्न सर्वांना महत्वाचा आहे.कचरा संकलन गाड्या सुरु केल्या, यामुळे कचर्याचा प्रश्न मार्गी लागला. आता रस्त्यावर वाहणारे पाणी, नालेसफाईमुळे सार्वजनिक स्वच्छता मोहिम हाती घेतल्याने तो प्रश्न मार्गी लागेल आहे, असे ते म्हणाले.
   यावेळी सरपंच रावसाहेब कर्डिले व दत्ता तापकिरे म्हणाले की, शिवाजीराव कर्डिले यांचे सक्षम नेतृत्व व विकास कामांवर असलेली पकड, यामुळे गावासह जिल्हा परिषद गट, पंचायत समिी गट, उपनगरातील छोटे-मोठे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी त्यांच्या मार्गादर्शनाखाली आम्ही पार पाडू, असे सांगितले.
ग्रा.पं.सदस्य रवि कर्डिले, विष्णू कर्डिले, नंदू साळवे, दिपक धाडगे, सुशिल ताकपिरे, निवृत्ती कर्डिले, राजेंद्र पाखरे यांनी आपले मनोगते व्यक्त केली. प्रास्तविकात राहुल माने म्हणाले की, ड्रेनेज कामे करतांना नागरिकही सहकार्य करतात. कामाचा दर्जा पाहतात तेव्हा चांगल्या प्रतीचे, दर्जेदार साहित्य वापरुनच ए.एम कंन्स्ट्रक्शन या एजन्सीनमार्फत कामे सुरु असून, चांगली करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे सांगितले.
    या शुभारंभास ग्रामसेवक रामदास दळवी, तात्या कर्डिले, श्रीधर पानसरे, किशोर कर्डिले, अशोक कवडे, अशोक येवले, बबन सुकटकर आदिंसह स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here