विकासकामांतून शहराचा चेहरामोहरा बदलूआ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 2, 2021

विकासकामांतून शहराचा चेहरामोहरा बदलूआ. संग्राम जगताप

 प्रभाग क्र. 4 मध्ये बंद गटारपाईप कामाचा शुभारंभ

विकासकामांतून शहराचा चेहरामोहरा बदलूआ. संग्राम जगताप

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः विकासकामांतून शहराचा चेहरामोहरा बदलायचा आहे. यासाठी नागरिकांच्या सहकार्याची खरी गरज आहे. गुलमोहर रोड आणि पार्डपलाईनच्या विकासकामासाठी मोठा निधीउपलब्ध करून दिला जाईल. शासन दरबारी पाठपुरावा सुर आहे. नगरसेवकांनी प्रभागाच्या विकासकामासाठी विकास आराखडा तयार करून विकासकामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावावीत. जमिनीअंतर्गत कामे सध्या शहरात सुरु आहेत. ती कामे मार्गी लागल्यानंतर शहरातील रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहे. प्रभाग क्र. 4 मध्ये नगरसेविका ज्योती गाडे यांच्या प्रयत्नातून मेघराज कॉलनी येथे बंद पाईप गटार कामाचा शुभारंभप्रसंगी आ. संग्राम जगताप बोलत होते.
   प्रभाग क्र. 4 मध्ये नगरसेविका ज्योती गाडे यांच्या प्रयत्नातून मेघराज कॉलनी येथे बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले.  यावेळी बोलताना नगरसेविका गाडे म्हणाल्या की, शहरातील नागरिक महापालिकेकडे कररुपी पैसे भरत असतात. त्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे केली जातात. विकासकामांचे नियोजन न केल्यास नागरिकांच्या पैशाच्या अपव्यय होतो. यासाठी विकासकामांचे नियोजन करणे गरजेचे आहे. म्हणून प्रभाग क्र. 4 मध्ये जमिनी अंतर्गत सर्व कामे मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंद पाईप गटार कामे सुरू आहेत. यानंतर प्रभागातील रस्त्याचे व सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहे. विकास कामांबरोबर प्रभागातील नागरिकांना बरोबर घेऊन धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवले जात असतात, असे ते म्हणाले. यावेळी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, माजी सभागृह नेते स्वप्निल शिंदे, उद्योजक अमोल गाडे, राष्ट्रवादी पक्षाचे शहर विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, नितीन शिंदे, मिलिंद गाणार, राजेंद्र वाघोले, उद्योजक अनिल जोशी, शिवाजी डोके, संदीप बोठे, वनमाला शिंदे, गिता गाणार, क्रषिकेश देशमुख, महेश कुटे, सुरज कुरलिये, लक्ष्मीकांत रोहोकले, सुरेखा रोहोकले, बबन रोहोकले, नवनाथ म्हस्के, काका छिंदम, मनोज जगताप, बाळासाहेब कचरे, राधाकृष्ण जाधव, भरत रोहोकले आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here