एकत्र कुटुंब पद्धतीने व्यवसायात वाढ होते : आ. अरुण जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 4, 2021

एकत्र कुटुंब पद्धतीने व्यवसायात वाढ होते : आ. अरुण जगताप

 एकत्र कुटुंब पद्धतीने व्यवसायात वाढ होते : आ. अरुण जगताप

सीए एन. एम. पोपटाणी कार्यालयाचे उद्घाटन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
एकत्र कुटंब पद्धतीमुळे संस्काराची व विचारांची देवाण-घेवाण होते. त्या माध्यामातून आपली संस्कारीत पिढी निर्माण होते. सध्याच्या काळामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. परंतु यात पोपटाणी कुटुंब अपवाद आहे. आजही संपूर्ण कुटुंब एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहे. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीने व्यवसाय वाढीस मदत होते. पोपटाणी परिवार हा प्रेमळ व प्रामाणिक आहे. सीए व्यवसायाच्या माध्यमातून माणुसकी निर्माण करुन आपल्या व्यवसायत प्रगती केली. सीए नंदलाल पोपटाणी यांनी सीए कसा असावा, हे समाजाला दाखवून दिले, असे प्रतिपादन आ. अरुणकाका जगताप यांनी केले.
   कोठी मार्केटयार्ड येथे एन. एम. पोपटाणी सीए कार्यालयाचे उद्घाटन आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सीए नंदलाल पोपटाणी, भारत पोपटाणी, मुकेश पोपटाणी, राजेश पोपटाणी, हरीष पोपटाणी, राजेश उदासी, साहील शेख, आरिफ शेख, संजय पोपटाणी, अशोक पोपटाणी, आर. डी. मंत्री, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक मनेष साठे, श्रीकांत झिने, सनी सूर्यवंशी, विकी जगताप, लकी खूबचंदानी, बाबासाहेब भगत, जयकुमार रंगलानी आदी यावेळी उपस्थित होते.
   यावेळी बोलताना सीए नंदलाल पोपटाणी म्हणाले की, अनेक वर्षांपासून सीए व्यवसायामध्ये पोपटाणी कुटुंब कार्यरत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक व्यावसायिकांना आर्थिक नियोजनाचे सल्ले देऊन व्यवसाय वाढीस सहकार्य केले. याच बरोबर वर्षभर विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here