हायजीन फस्टच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे : प्रदीप कुटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

हायजीन फस्टच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे : प्रदीप कुटे

 हायजीन फस्टच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे : प्रदीप कुटे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नागरिकांना स्वच्छ व हायजीन अन्नपदार्थ मिळावेत यासाठी शहरात अनेक वर्षापासून जनजागृती करणार्‍या हायजीन फस्ट या संस्थेच्या वतीने शहरातील विविध भागात रस्त्यवर हातगाडींवर खाद्याविक्री करणार्‍यांनी अन्नपदार्थ व परिसराच्या स्वच्छतेचे निकष पाळावे यासाठी रोटरी क्लब सेन्ट्रल, आय लव्ह नगरच्या संयुक्त विद्यमाने ‘हायजीन हातगाडी पुरस्कार’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शहरातील माळीवाडा, आनंदधाम चौक चौपाटी, प्रोफेसर कॉलनी चौकातील चौपाटी, दिल्लीगेट, पारिजात चौक येथील हातगाड्यांवर खाद्यपदर्थ विक्रेत्यांची पाहणी करण्यात आली. या उपक्रमात स्वच्छतेचे सर्व निकष पाळणार्‍या हातगाडी चालकांना अन्न औषध निरिक्षक प्रदीप कुटे यांच्या हस्ते सन्मानपत्र, अ‍ॅप्राँन, टोपी देण्यात आली. यावेळी हायजीन फस्टच्या वैशाली गांधी, सदस्य अनुराधा रेखी, गायत्री रेणावीकर, वैशाली मुनोत, डॉ.रोहित गांधी, स्वाती गुंदेचा, रोटरी क्लब सेन्ट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, सचिव ईश्वर बोरा, आय लव्ह नगरच्या विशाखा पितळे, आश्लेषा भांडारकर, निर्मला गांधी, आदिंसह व्यावसायिक उपस्थित होते.
   यावेळी निरिक्षक प्रदीप कुटे म्हणाले, सध्याच्या काळात नागरिकांचा बाहेरचे अन्न घेण्याचा कल वाढला आहे.मात्र सध्याच्या रोगराईच्या दिवसांमध्ये शुद्ध व सात्विक अन्न मिळणे अत्यावश्यक आहे. यासाठी हायजीन फस्ट संस्था सामाजिक जाणीवेतून नागरिक व खाद्याविक्रेत्यांमध्ये स्वच्छतेसाठी जागृती करत आहेत. ज्याठिकाणी स्वच्छ अन्नपदार्थ व परिसर स्वच्छ असतो तेथे व्यवसायास चालना मिळते. त्यामुळे हायजीन फस्टच्या जागृतीचे हे काम अत्यावश्यक व महत्वाचे आहे. या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे.
प्रास्ताविकात वैशाली गांधी म्हणाल्या, नागरीकांनी बाहेरचे अन्न घेतांना अन्नपदार्थ स्वच्छ व उत्तम दर्जाचे असावेत, बाहेरील जंतू विषाणूंचा संसर्ग होवू नये यासाठी जागरूक असावे. हायजीन फस्ट संस्थेच्या वतीने राबवलेल्या या उपक्रमात शहरातील भरपूर हातगाडी चालकांनी उत्फूर्तपणे सहभाग घेवून स्वच्छतेचे निकष पूर्ण केले आहेत त्यांना सन्मानपत्रे दिले आहेत. कार्याक्रमचे प्रास्ताविक अनुराधा रेखी यांनी केले. आभार ईश्वर बोरा यांनी मानले. संदीप जाधव व व्यवसायिकांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment