नगरची विकसित शहर म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील ः अविनाश घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 23, 2021

नगरची विकसित शहर म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील ः अविनाश घुले

 सारसनगर, पारिजात कॉलनी येथील रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

नगरची विकसित शहर म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील ः अविनाश घुले

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर शहर हे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा यामधील मध्य शहर असून, त्यामुळे शहराला विशेष महत्व आहे. त्याचबरोबर शहराला ऐतिहासिक पार्श्वभुमी असल्याने पर्यटकही या ठिकाणी येत असतात. त्यामुळे आपल्या शहराची विकसित शहर म्हणून ओळख निर्माण करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी आ.संग्राम जगताप पुढाकार घेत असून, आपणही मनपाच्या माध्यमातून या विकासात योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर प्रभागातील मुलभुत सुविधांबरोबर प्रभागात इतर प्रकल्प राबवून एक आदर्श प्रभागकडे वाटचाल सुरु आहे. नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी आपण नेहमीच तत्पर असतो. प्रभागातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत, काही सुरु आहेत. नागरिकांच्या सहकार्याने प्रभागाचा विकास होत आहे, ही प्रक्रिया निरंतर सुरु राहील, असे प्रतिपादन स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी केले.
   प्रभाग क्र.11, सारसनगर, पारिजात कॉलनी येथील रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगरसेविका रुपाली पारगे, भा. कुरेशी, इम्रान जहागिरदार, छबुराव कांडेकर, के.डी.देशमुख, के.एस.क्षेत्रे, प्रणिल कसोटे, मिलापचंद पटवा, आनंद दरेकर, अक्षय कांडेकर, दिशा गवळी, सुरेखा देशमुख, लिला पटवा, वैशाली दरेकर, वैशाली साळवे, शितल मुनोत, शालिनी क्षेत्रे, नानासाहेब गायकवाड आदि उपस्थित होते.
   मिलापचंद पटवा म्हणाले, सारसनगर भागात चांगल्या वसाहती निर्माण झाल्या आहेत. येथील नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यास यासाठी प्रभागाचे नगरसेवक प्रयत्न करत आहेत. मुलभुत सुविधाबरोबर या भागाच्या सौदर्यात भर टाकणारे प्रकल्प उभे राहवेत, यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here