पवार हॉस्पिटलवर हल्ला करणार्‍या आरोपींना अटक करा, डॉक्टरांची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 27, 2021

पवार हॉस्पिटलवर हल्ला करणार्‍या आरोपींना अटक करा, डॉक्टरांची मागणी

 पवार हॉस्पिटलवर हल्ला करणार्‍या आरोपींना अटक करा, डॉक्टरांची मागणी

डॉक्टर संघटना व निमाचे पोलिस अधिक्षकांना निवेदन

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः सावेडीमधील वसंत टेकडी जवळ असलेल्या पवार हॉस्पिटलवर हल्ला करुन डॉ.राजेंंद्र जयसिंगराव पवार व पत्नी डॉ.रोहिणी राजेंद्र पवार यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देणार्या सर्व आरोपींना त्वरित अटक करावी, अन्यथा संघटनेच्यावतीने आम्ही सर्व डॉक्टर्स दवाखाने बंद ठेवून रस्त्यावर येऊन आंदोलन करु, असा इशारा अहमदनगर व सावेडी डॉक्टर्स असोसिएशन, निमा संघटना, होमिओपॅथी  अहमदनगर अशा विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांना भेटून निवेदनाद्वारे दिला.
   यावेळी निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.रविंद मिरगणे, सेक्रेटरी डॉ.प्रशांत महांडूळे, सावेडी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल वाघुले, उपाध्यक्ष डॉ.प्रकाश गिरमे, सेक्रेटरी डॉ.भागवान कराळे, डॉ.राहुल कुलकर्णी, होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. रणजित सत्रे, डॉ.मंगेश काळे, डॉ.अरविंद गायकवाड, डॉ.दिपक दरंदले, डॉ.नितीन झावरे, डॉ.अमोल खेडकर, डॉ.तुषार देशपांडे, डॉ.के.के. आहुजा, डॉ.समीर होळकर, डॉ.धाराणी आदि उपस्थित होते.
   याबाबत सविस्तर माहिती अशी कि, 17 मार्च 2021 रोजी एका रुग्णावर उपचार सुरु होते, योग्य ते उपचार डॉ.पवार दाम्पत्य करीत असतांना रुग्णाची काहीही तक्रार नसतांना नातेवाईकांनी मात्र जमावाच्या मदतीने मध्यरात्री दवाखाना बंद असतांना गेटवरुन चढून खिडक्याच्या काचा फोडून ओपीडीमध्ये प्रवेश करीत दगडफेक केली. डॉ.पवार यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तोफखाना पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला. 12 आरोपी असतांना फक्त 3 आरोपींना अटक करुन पोलिस निरिक्षक श्री.गायकवाड यांनी देखील डॉ.पवार यांना अपमानास्पद व हिन वागणूक दिली. तरी पोलिस अधिक्षक श्री.मनोज पाटील यांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी डॉक्टरांनी निवेदनात केली आहे.
   जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी तोफखाना पोलिस स्टेशनशी संपर्क साधून निरिक्षक श्री.गायकवाड यांना डॉक्टर हे जनतेचे देवदूत आहेत, त्यांच्याशी आदराची भावना ठेवून वागले पाहिजे. अशी समज देऊन आरोपींचा शोध घ्यावा, अशी सूचना केली. संघटनेच्या डॉक्टरांशी श्री.पाटील यांनी सुसंवाद साधून तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे सांगितले.  डॉ.राजेंद्र पवार, डॉ.रोहिणी पवार यांच्याशी श्री.पाटील यांनी आपुलकीने चर्चा करुन न्याय देण्याची ग्वाही दिली.

No comments:

Post a Comment