अहमदनगर महानगरपालिका 2021-22 ः 685 कोटी 89 लाखांचे अंदाजपत्रक ‘स्थायी’त सादर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 18, 2021

अहमदनगर महानगरपालिका 2021-22 ः 685 कोटी 89 लाखांचे अंदाजपत्रक ‘स्थायी’त सादर.

 अहमदनगर महानगरपालिका 2021-22 ः 685 कोटी 89 लाखांचे अंदाजपत्रक ‘स्थायी’त सादर.

चितळे रोडवर भाजी मार्केट, सावेडीतील नाट्यगृह बांधकाम पूर्ण करण्याचा संकल्प.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः फेज 2 अमृत पाणीपुरवठा योजना, सोलर प्रकल्प, ग्रीन स्पेसेस, चितळे रोडवरील भाजी मार्केट विकसित करणे. नाट्यगृह बांधकाम पूर्णत्वास नेणे. कचरा डेपो सुधारणी व प्रकाल्प योजना, स्ट्रीट लाईट, गटार योजना, कोरोना प्रतिबंधात्मक योजना इ. योजनेंचा समावेश असणारे. 2021-22 चे महानगरपालिकेचे 685 कोटी 89 लाख रुपयांचे अंदाजपत्रक मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी स्थायीचे सभापती अविनाश घुले यांचेकडे आज सादर केले आहे. उद्या सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात येणार आहे.
   सभेच्या सुरुवातीला माजी खासदार दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सादर केलेल्या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न रु. 305 पाच कोटी 95 लाख, भांडवली जमा रु. 332 कोटी 63 लाख धरण्यात आले आहे. महसुली उत्पन्नात संकलित करापोटी रु. 40 कोटी 50 लाख, संकलित करावर आधारित करापोटी 53 कोटी 24 लाख, जीएसटी अनुदान 103 कोटी 40 लाख व इतर महसुली अनुदान रु. 9 कोटी 33 लाख, गाळा भाडे 3 कोटी पाणीपट्टी 22 कोटी, मीटरद्वारे पाणीपुरवठा पोटी 42 कोटी, संकीर्ण 9 कोटी इ. महत्त्वाच्या बाबींसह महसुली खर्च 225 कोटी 24 लाख धरण्यात आला आहे. तसेच भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरून रू. 385 कोटी 71 लाख अंदाजित जमा होणार आहेत.
   तसेच खर्च बाजूस वेतन, भत्ते व मानधनावर 122 कोटी, पेन्शन 38 कोटी, पाणीपुरवठा वीज बिल 31 कोटी 50 लाख, स्ट्रीट लाईट बिल 6 कोटी 50 लाख, शिक्षण मंडळ वर्गणी 2 कोटी, महिला व बालकल्याण योजना 51 लाख, अपंग पुनर्वसन योजना 51 लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना 1 कोटी 52 लाख, मा. सदस्य मानधन 1 कोटी 80 लाख, औषधे व उपकरणे 60 लाख, मा. सदस्य प्रभात स्वच्छ निधी 6 कोटी 11 लाख, कचरा संकलन व वाहतूक 5 कोटी, पाणीपुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती 70 लाख, टँकरद्वारे पाणीपुरवठा व तुरटी, बिचींग पावडर खरेदी 1 कोटी 82 लाख, अशुद्ध पाणी आकार 2 कोटी, विविध वाहने खरेई 1 कोटी 85 लाख, नवीन रस्ते 1 कोटी 75 लाख, रस्तेदुरुस्ती 1 कोटी 75 लाख, इमारत दुरुस्ती 40 लाख, शहरातील ओढे-नाले साफसफाई 41 लाख, आपत्कालीन व्यवस्थापन 40 लाख, कोड वाड्यावरील खर्च 20 लाख, वृक्षारोपण तदनषंगिक खर्च 20 लाख, हिवताप प्रतिबंधक योजना 35 लाख, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी 2 कोटी 50 लाख, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त 1 कोटी 10 लाख यासह इतर बाबींवर खर्च करण्यात येणार आहे.
   त्याचप्रमाणे शासनाकडून प्राप्त विविध कामांसाठी च्या निधीची मनपा हिस्स्यांची रक्कम भरणे प्रस्तावित आहे. अमृत योजनेतील पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना, सोलर प्रकल्प, ग्रीन स्पेसेस इ. कामे तसेच घनकचरा संदर्भातील डीपीआर मधील कामे, शहरातील चितळे रोड, भाजी मार्केट जागा विकसित करणे, नाट्य गृहांचे बांधकाम पूर्णत्वास नेणे, तसेच शासकीय योजना पूर्ण करणे व शहरातील विविध भागांचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
   सध्या शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर लक्ष केंद्रित करून शहर वासीयांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. तसेच कोरोना लसीकरण सुलभ होण्यासाठी उपाय योजना करणेत येत आहेत.
    याप्रसंगी मनपा आयुक्त म्हणाले की, शासनाच्या सर्व योजना पूर्ण केल्या जातील शहरातील सर्व प्रश्न, समस्यांचा अभ्यास करून मी शहरातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करील अमृत योजना फेस 2 पूर्ण करण्यास माझे प्राधान्य राहील. सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मी ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. शहरातील पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागेल असेही ते म्हणाले.
   यावेळी आयुक्त श्री. शंकर गोरे, उपायुक्त श्री. प्रदीप पठारे, उपायुक्त श्री. यशवंत डांगे, मुख्य लेखाधिकारी श्री. प्रवीण मानकर, नगर सचिव श्री. शहाजहान तडवी, लेखा विभागाचे श्री. अनिल लोंढे, आदीसह स्थायी समिती सदस्य मुदस्सर शेख, प्रकाश भागानगरे, शाम नळकांडे, रवींद्र बारस्कर, सुप्रिया जाधव, वंदना ताठे, रीता भाकरे, समद खान, सचिन शिंदे, सागर बोरुडे, प्रशांत गायकवाड व खातेप्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment