कलाकार तंत्रज्ञांना मोफत करोना लस मिळावी : नजान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 16, 2021

कलाकार तंत्रज्ञांना मोफत करोना लस मिळावी : नजान

 कलाकार तंत्रज्ञांना मोफत करोना लस मिळावी : नजान

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मराठी चित्रपट,नाट्य कलाकार आणि तंत्रज्ञ यांना मोफत कोरोना लस मिळावी अशी मागणी जिल्हा समन्वयक शशिकांत नजान यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष  मा.श्री.मेघराज राजेभोसले यांचेकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
   नजान यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे की, लॉकडाऊन नंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना अनेक चित्रपट, मालिका,वेबसिरीज यांचे मा.शासनाच्या कोरोना नियमावलीचे पालन करून चित्रीकरण सुरू झाले. परंतु काही महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले आहे.मा.शासनाच्या वतीने जेष्ठ नागरिक तसेच मधुमेह,उच्च रक्तदाब व इतर काही आजार असणार्‍या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.
   चित्रपट, मालिका,नाटक,वेबसिरीज आणि लोककला व इतर सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकार आप-आपल्या माध्यमातून मनोरंजनाचे कार्य करीत आहेत.आपणस विनंती आहे की, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांना आपल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून जेष्ठ नाट्य-चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ, लोककलावंत यांना मोफत कोरोना लस मिळावी
   या मागणी बाबत अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले आणि खजिनदार श्री.संजय ठुबे यांचेशी नजान यांनी चर्चा केली. या पत्राचा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांनी सकारात्मक विचार केला ते म्हणाले की ही मागणी अतिशय रास्त असून शासनदरबारी मागणी  बाबत पाठपुरावा करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here