आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी महिलांनी रस्त्यावर उतरावे : प्रदेशाध्यक्षा उमा खापरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 4, 2021

आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी महिलांनी रस्त्यावर उतरावे : प्रदेशाध्यक्षा उमा खापरे

 भाजपा महिला आघाडीची संघटनात्मक बैठक संपन्न

आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी महिलांनी रस्त्यावर उतरावे : प्रदेशाध्यक्षा उमा खापरे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः राज्यातील आघाडी सरकार हे महिलांना संरक्षण देण्यापेक्षा अत्याचारच जास्त करत आहेत. कुंपणच शेत खात आहे, असा कारभार राज्य सरकार करत आहे. मंत्र्यानेच स्त्रीवर अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त करावे ही अतिशय निंदनीय घटना आहे. संजय राठोड यांच्या विरोधात राज्यभर  भाजपा महिला आघाडीच्या 20 हजार महिला रस्त्यावर उतरत राज्यात एकाच वेळी 100 ठिकाणी आंदोलने केल्याने संजय राठोड यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. नगरमध्येही महिलांचे चांगले आंदोलन झाले. संजय राठोड यांचा राजीनामा हे भाजापा महिला आघाडीचे मोठे यश आहे. सरकारचा कोणावरच वचक राहिलेला नाहीये. जळगावच्या पोलिसांनी वसतिगृहातील मुलींबरोबर केलेली घटना संतापजनक आहे. त्यामुळे आता महिलांनी घरात न बसता राज्यातील या अन्यायकारक आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी रत्यावर उतरले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपा महिला आघडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केले.
   नगर शहर व दक्षिण जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या संघटनात्मक बैठकीचे आयोजन भाजपा महिला आघडीच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या अध्यक्षतेखाली नगरमध्ये झाले. भारतमाता पूजनाने बैठकीस सुरवात झाली. यावेळी प्रदेश संघटन सरचिटणीस दिपाली मोकाशी, सरचिटणीस सुरेखा विद्दे, प्रदेश कोषाध्यक्षा शैला मोकळ, प्रसिद्धी प्रमुख मनीषा जैन, कोमल काळभोर, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा अंजली वल्लाकटी, दक्षिण जिल्हाध्यक्षा आश्विनी थोरात, गीता गिल्डा, शहरजिल्हध्यक्ष महेंद्र गंधे आदी व्यासपिठावर उपस्थित होते. या बैठकीत भाजपच्या शहर व दक्षिण जिल्हा कार्यकारणीच्या नूतन पादाधीकारींना उमा खापरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्षा, नगरसेविका, सरपंच, महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
   उमा खापरे पुढे म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना प्राधान्य देत अनेक योजना राबवून महिलांना मोठी ताकद दिली आहे. भाजप आपल्या बूथ रचनेवर भक्कमपणे उभा आहे. त्यामुळे महिला आघाडीनेही आपली बूथ रचना लवकरात लवकर पूर्ण करून पक्षाचे कार्य वेगाने होण्यासाठी काम करावे. प्रास्ताविकात शहराध्यक्षा अंजली वल्लाकटी म्हणाल्या, महिलाही आता राजकारणात सक्रीय होत मागे नाहीत. प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्यात महिला काम करत आहेत. नगर शहर व जिल्ह्याच्या पहिल्याच बैठकीला प्रदेशाध्यक्षांची उपस्थितीती लाभली हे आमचे भाग्य आहे. नगरमध्ये महिला आघाडी खूप चांगले काम करून दाखवेल अशी ग्वाही मी देते. यासाठी जास्तीतजास्त महिलांना भाजपशी जोडणार आहे. यावेळी संघटन सरचिटणीस दिपाली मोकाशी यांनी आत्मनिर्भर भारत या योजनेची माहिती दिली. दिपाली मोकळ यांनी बूथ रचना बद्दल माहिती देवून शहर व जिल्ह्याचा आढावा घेतला. बैठकीचे सूत्रसंचलन संघटन सरचिटणीस प्रिया जानवे यांनी केले. शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे व सरचिटणीस अ‍ॅड. विवेक नाईक यांनी शहराच्या वतीने उमा खापरे यांचा सत्कार केला. यावेळी अर्चना चौधरी, उषा जाधव, सविता तागडे आदींसह मोठ्या संख्येने शहर व तालुक्यांतील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here