शासकीय कामात अडथळा; गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

शासकीय कामात अडथळा; गुन्हा दाखल

 शासकीय कामात अडथळा; गुन्हा दाखल

अहमदनगर : आप्पा बन्सी औटे  रा. सोनेवाडी रोड लोंढे मळा यांनी नोटीस बजावण्यासाठी आलेल्या कोतवाली पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल सतीश मारुती शिंदे यांना आरडाओरडा करून धक्काबुक्की करीत शर्ट चे बटन तोडून शासकीय कामात अडथळा आणल्या बाबत औटी यांचेवर कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   कॉन्स्टेबल शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, औटी यास सीआरपीसी कलम 149 प्रमाणे प्रतिबंधक नोटीस बजावणी साठी दाखल एनसीतील घटना घडली हे ठिकाण माझ्या ड्युटी असलेल्या पेट्रोलिंग हद्दीतील असून मी व माझे सोबतचे होमगार्ड कर्मचारी यांचे बरोबर सोनेवाडी रोड, लोंढे मळा, केडगाव अ. नगर येथे अप्पा बन्सी औटे याचे राहते घरासमोर येथे काल रात्री 09.30 वा तुम्हास गेलो असता,औटे यांना नोटीस घेण्यास सांगितले असता मी नोटीस घेणार नाही असे म्हणून मोठ्यामोठ्याने आरडाओरडा करू लागला त्यावेळी आम्ही त्यास समजावून सांगत असताना त्याचा राग येऊन आप्पा बन्सी औटे हा अंगावर धावून आला व मला धक्काबुक्की केली व माझे युनिफॉर्म ची कॉलर धरून झटका देऊन माझे शर्टचे दोन बटन तोडले व फिर्यादी तिला पण मी जिवंत सोडणार नाही तिने कशी माझ्या विरुद्ध तक्रार दिली असे म्हणून आम्ही करत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणला म्हणून माझी त्याचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here