महेश मध्यान पदाच्या माध्यमातून समाजोन्नत्तीने काम करतील- विक्रम राठोड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 23, 2021

महेश मध्यान पदाच्या माध्यमातून समाजोन्नत्तीने काम करतील- विक्रम राठोड

 लोढा हाईटस् व्यापारी असो. व शिवसेनेच्यावतीने सत्कार

महेश मध्यान पदाच्या माध्यमातून समाजोन्नत्तीने काम करतील- विक्रम राठोड

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगरमध्ये सिंधी समाज मोठ्या प्रमाणात आहे, नगरकरांचा एक अविभाज्य भाग असलेल्या या समाजाने नेहमीच विविध क्षेत्रात योगदान दिले आहे. सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष असलेल्या स्व.लालूशेठ मध्यान यांनी नगरच्या सामाजिक  कार्यातही सहभागी असत. समाजचे संघटन करुन दिशा देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या अकस्मिक निधनाने मोठी हानी झाली आहे. मध्यान कुटूंबियांने नेहमीच समाज उन्नत्तीचे काम केले आहे. महेश मध्यान हेही समाजातील विविध उपक्रमात नेहमीच सक्रिय राहून कार्य करत आहेत. चाली हो उत्सवाबरोबरच धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य सर्वांना परिचित आहेत. आता अध्यक्षपदाची सोपवलेली जबाबदारी ते सर्वांना बरोबर घेऊन पार पाडतील. समाजातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देतील. त्यांच्या कार्यास सहकार्य देऊ, असे प्रतिपादन शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी केले.
   सिंधी जनरल पंचायतच्या अध्यक्षपदी महेश मध्यान यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा लोढा हाईटस् व्यापारी असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष व शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राजु गुरुनानी, रमेश तनवानी, महेश कुकरेजा, पपी नागपाल, संजय तनवानी, मनिष गोपलानी, जयराम मेहतानी, ठाकूर चुग, दिलीप आहुजा, हरेश वाधवानी, जगदीश आहुजा, कन्हैय्यालाल लुथिया, विनोद कुकरेजा आदि उपस्थित होते. सत्कारास उत्तर देतांना महेश मध्यान म्हणाले, समाजसेवेचा वारसा आपल्याला घरातून मिळालेला असल्याने आपण सामाजिक कार्यात सक्रिय आहोत. समाजातील विविध उपक्रमातील सक्रिय सहभागातून समाजाचे देणे लागतो, या भावनाने काम करत आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्हैय्यालाल लुथिया यांनी केले तर आभार राजू गुरुनानी यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here