विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी महाविद्यालय प्रयत्नशील ः प्रा. डॉ. बार्नबस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 2, 2021

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी महाविद्यालय प्रयत्नशील ः प्रा. डॉ. बार्नबस

 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी महाविद्यालय प्रयत्नशील ः प्रा. डॉ. बार्नबस

राष्ट्रभाषा सभा, पुणे आयोजित स्पर्धेत अहमदनगर महाविद्यालयाचे यश

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाच्या आदेशानुसार महाविद्यालय बंद असले तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन, झुम अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. विद्यार्थीही ऑनलाईन अभ्यासातून आपली प्रगती साधत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमही सुरु आहेत. यामध्येही विद्यार्थी यश संपादन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी केले.
महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे द्वारा आयोजित एकांकिका, निबंध तसेच समुह गीत स्पर्धेत अहमदनगर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन पारितोषिके मिळविल्याबद्दल त्यांचा प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख डॉ.ऋचा शर्मा, प्रा.अशोक घोरपडे, प्रा.फरहान शेख आदि उपस्थित होते.
याप्रसंगी ऋचा शर्मा म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांनी विविध स्पर्धा सहभागी होऊन आपल्यातील कला गुण विकसित करण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते. राष्ट्रभाषा पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे महाविद्यालयासाठी अभिमानास्पद अशी आहे. असे सांगून स्पर्धेविषयी माहिती दिली.
प्रा.अशोक घोरपडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करुन आभार मानले
.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here