वांढेकर यांचे दुग्ध उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर उपोषण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

वांढेकर यांचे दुग्ध उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर उपोषण

 वांढेकर यांचे दुग्ध उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर उपोषण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः जिल्हा दूध संघाने तालुका दूध संघाकडे वर्ग केलेल्या 70 संस्था सभासदांना सभासदत्व द्यावे अन्यथा तालुका दुध संघाची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी मोहोज खुर्द (ता. पाथर्डी) येथील सिद्धार्थ सहकारी दूध संस्थेचे चेअरमन जे.बी. वांढेकर यांनी नाशिक येथील विभागीय दुग्ध उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालया समोर उपोषण केले.
    अहमदनगर जिल्हा दूध संघाचे विभाजन होऊन दि.25 नोव्हेंबर 2000 पासून दूध संकलन वृद्धेश्वर सहकारी दूध संघाने (ता. पाथर्डी) सुरू केले आहे. त्यापासून 141 दूध संस्था तालुका दूध संघाकडे जिल्हा दूध संघाने वर्ग केल्या आहेत. 141 पैकी 71 संस्था सभासदत्व देण्यात आले. मात्र 70 संस्था सभासदांना आज पर्यंत सभासद करण्यात आलेले नाही. उर्वरीत संस्था सभासदांना सभासदत्व देऊन त्यांचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेकवेळा आंदोलन, उपोषण करुन पाठपुरावा करण्यात आला. सदर प्रश्नी जिल्हा दूध संघाचे सभासद संस्था यांना दि.29 जानेवारी 2005 च्या आदेशानुसार तालुका दुध संघाच्या सभासद असल्याचे लेखी देण्यात आले होते. परंतु आजपर्यंत सत्तर सभासदांना सभासदत्व नाकारण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment