विदेशी दारूची वाहतूक करणारा गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

विदेशी दारूची वाहतूक करणारा गजाआड.

 विदेशी दारूची वाहतूक करणारा गजाआड.

भिंगार कॅम्प पोलिसांची कार्यवाही.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर मधील चांदणी चौकात विदेशी दारूची वाहतूक करताना ऋषिकेश लक्ष्मण बोरुडे वय 21, सारोळा बद्दी यास अटक करून गुन्हा दाखल करून विदेशी दारूसह 60,620 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भिंगार कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.
   सदर घटनेची हकीकत अशी की, कॅम पो.स्टे, भिंगार चे प्रभारी अधिकारी सपोनि शिशिरकुमार देशमुख यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, चांदणी चौक, अहमदनगर येथे एक इसम हा विनापरवाना बेकायदा विदेशी दारूची वाहतूक करीत आहे अशी बातमी मिळाल्याने ऋषिकेश लक्ष्मण बोरुडे व 21 रा.सारोळा बद्दी ता. नगर जि. अहमदनगर यास ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे ताब्यात एक होंडा शाईन कंपनीची मोसानं एमएच 16 बी टी 9423 अशी 50,000/ रु. किंची विदेशी दारू 10,620/ असा एकूण 60,620/ किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. विशाल ढुमे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोहेकॉ गोविंद दादासाहेब गोल्हार, पी जी पवार, ए.एन. नगरे, रमेश वराट, राहुल राजेंद्र द्वारके, संतोष भाऊसाहेब आडसूळ, जी एस साठे, अरुण मोरे, सागर तावरे, एम.एस. निमसे, यांनी केली आहे गुन्हाचा तपास पोना. राहुल द्वारके हे करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here