एमपीएससी परीक्षा पुढे ढकलणे म्हणजे पळवाट काढणे ः राजे
कोरोना प्रतिबंधात्मकतेचे उपाययोजना करुन एमपीएससीचे परीक्षा घेण्याची समाजवादी पार्टीची मागणीनगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनाचे संक्रमण वाढत असताना कोरोना प्रतिबंधात्मकतेचे उपाययोजना करुन एमपीएससीची परीक्षा घेण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी दिली.
गेल्या वर्षी एप्रिल 2020 मध्ये राज्यसेवा व इतर परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर मराठा आरक्षणावर स्थगिती येण्यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 आक्टोबर, 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षा 22 नोव्हेंबर रोजी होणार होती. या तीन परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या. पुढच्या परीक्षा कधी होणार याबाबत विचारणा सुरू होती. दरम्यान राज्य सरकारने शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया व नोकरभरती मार्गी लावण्यासाठी एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून इडब्ल्यूएस प्रवर्गातून लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमपीएससी ने परीक्षांसाठी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना इडब्ल्यूएस किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय निवडण्याची सूचना आयोगाने केली होती. त्यासाठी 15 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली. मराठा संघटनांनी आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तो पर्यंत परीक्षा घेऊ नये अशी मागणी केली होती, पण विद्यार्थ्यांनी परीक्षा घ्यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरली होती. पण विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा 14 मार्च, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्च रोजी होईल तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षा 11 एप्रिल रोजी होईल असे आयोगाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले होते. 14 मार्चची परीक्षा अवघ्या तीन दिवसा़ंवर आलेली असताना विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गेले आहेत. सर्व तयारी झालेली असताना पुन्हा एकदा राज्य सेवेची परीक्षा पुढे ढकलली आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापुढे स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या जाणार नाहीत या तारखा आता अंतिम आहेत. असे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.
No comments:
Post a Comment