ब्रेक फेल! टेम्पो घुसला कान्हुर पठार बसस्थानकात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

ब्रेक फेल! टेम्पो घुसला कान्हुर पठार बसस्थानकात.

 ब्रेक फेल! टेम्पो घुसला कान्हुर पठार बसस्थानकात.

एक ठार, चार जखमी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः श्रीगोंदा तालुक्यातून द्राक्षे नाशिकला घेऊन जाणारा टेम्पो ब्रेक फेल झाल्याने कान्हुर पठार बसस्थानकात घुसल्यामुळे मोटरसायकल स्वाराचा मृत्यू तर अन्य 4 जन गंभीर जखमी झाले आहेत. काल सायंकाळी ही घटना घडली आहे. टेम्पो बसस्थानकात शिरल्याने बसस्थानकाचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा कडून नाशिक येथे जाणार्‍या (एम.एच. 15 डीके 6389) या द्राक्षे भरलेल टेम्पोने बस स्थानक उडवले. काल सायंकाळी झालेल्या अपघातामध्ये राहुल शिवराम पवार (वय 17 वडगाव दर्या) हा जागीच ठार झाला आहे. तर या अपघातात अतुल शिवराम घुले (वय 50 पिंपळगाव रोठा) हा गंभीर जखमी झाला आहे. प्रकाश सतीश शिंदे (वय 14) गणेश आबा रोकडे (वय 20 वडगाव सावताळ) रंजना राजु पवार( वय 38 , वासुंदे) जखमी झाले आहेत, तर चारचाकी व दुचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टेम्पोचालक अतुल प्रजापती याला पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
   हा टेम्पो श्रीगोंदा तालुक्यातुन द्राक्षे घेऊन नाशिक याठिकाणी चालला होता. कान्हुर पठार बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून दोन दिवसांत अतिक्रमण स्वताहून काढून घेण्यात यावी. अन्यथा अतिक्रमण शासन पातळीवर काढणार असल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले. पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, सपोनि विजयकुमार बोत्रे  पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here