श्रीक्षेत्र कोरठण येथे वीर उत्सव साजरा पानिपतच्या वीराची वाजत-गाजत मिरवणुक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 30, 2021

श्रीक्षेत्र कोरठण येथे वीर उत्सव साजरा पानिपतच्या वीराची वाजत-गाजत मिरवणुक

 श्रीक्षेत्र कोरठण येथे वीर उत्सव साजरा पानिपतच्या वीराची वाजत-गाजत मिरवणुक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः पारनेर तालुक्यातील पिंपळगांवरोठा येथील जाधव परिवार (न्हावी) यांच्या वतीने होळीचे पुजन करुन पिढीजात कुटूंब प्रथेनुसार गावातुन वीराची वाजत गाजत मिरवणुक काढली. विराची मिरवणुक काढण्यामागे ज्यांना वीरमरण आले त्यांना ‘वीर’ म्हणतात. इतिहासात ज्यावेळी “ पानीपतचे” युद्धे झाले; त्यावेळी महाराष्ट्रातून बर्याचशा घरातून युद्धासाठी सैनिक म्हणुन जी व्यक्ती गेली व मरण पावली, त्यांना वीर म्हटलं गेलं.
आजकाल शहीद जवानांना ज्या प्रमाणे गावात महत्व दिले जाते. त्यांचे पुतळे बनविले जातात, त्याचप्रमाणे पुर्वीच्या काळी वीर मरण आलेल्या व्यक्तींचे गावात नदी काठी मुर्ती बनवून स्थापित केल्या जात. तसेच घरातील देवघरात टाक बनवुन त्यांची विधीवत पुजाअर्चा केली जाते. महाराष्ट्रात नाशिक मधुन जास्त वीर युद्धासाठी गेले होते. होळीच्या दुसर्या दिवशी पानीपतची लढाई झालेली होती म्हणतात. म्हणुनच आपण उपासकरु जेऊ त्या दिवशी घालतो.
    सैनिकाच्या आवडी-निवडीनुसार वीर काढणे. त्यांच्या अपुर्ण राहिलेल्या इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न या दिवशी केला जातो. अविवाहित किंवा ज्यांचे लग्न जमले होते. परंतु वीरमरण आल्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही, अशा वीरांच्या मुर्तीला देव मानुन बाशिंग वाहण्याची प्रथा नाशिकमध्ये अजुनही चालु आहे. काही वीर ‘नवसाला पावणारे’ आहेत. हा सण व उत्सव ब्राम्हण लोक देखील वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. अशा पद्धतीने हा होळीपुजन नंतर सण मोठ्या उत्साहात सालाबादप्रमाणे साजरा केला जातो, अशी माहिती संतोष जाधव यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here