शिवराष्ट्र सेनेचे अविनाश घुलेंना निवेदन.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 13, 2021

शिवराष्ट्र सेनेचे अविनाश घुलेंना निवेदन..

 शिवराष्ट्र सेनेचे अविनाश घुलेंना निवेदन..

महापालिकेने स्वतःच्या मालकीचे वैद्यकीय कॉलेज उभारावे.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः महानगर पालिका हद्दीत दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या व भूभागाची व्याप्ती पाहता पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरांकडे जाणार्‍या नागरिकांचे शिक्षणासाठी व नोकरीसाठी जाणारे लोंढे थांबविण्यासाठी महानगर पालिकेने आपल्या शहरातील नागरिकांच्या स्वत:च्या मुलांसाठी स्वतःचे वैद्यकीय विद्यालय सुरु करावे. अशी मागणी शिव राष्ट्र सेना अध्यक्ष संतोष नवसुपे व दलित आघाडी प्रमुख अनिल शेकटकर यांनी स्थायीचे सभापती अविनाश घुले यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
   नगर महापालिकेच्या येणार्‍या अर्थसंकल्पामध्ये नगर शहरातील व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय विद्यालये उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी. अशी मागणी शिवराष्ट्र सेनेच्यावतीने करण्यात आली. अहमदनगर मध्ये मनपाने वैद्यकीय कॉलेज उभरल्यास, माफक दरात विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन शहराला या निमित्ताने सौंदर्य व मोठे वैभव या विद्यालयाने प्राप्त होईल व शहराचा वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग सुकर होईल. खासगी विद्यालयात विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबेल. असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment