उद्याने ही शहराच्या विकासात व सौंदर्यात भर घालणारे : आ. संग्राजगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 30, 2021

उद्याने ही शहराच्या विकासात व सौंदर्यात भर घालणारे : आ. संग्राजगताप

 1 टन भंगार साहित्यातून 13 फूट उंचीचा बोटीवरचा मत्स्य शिल्प निर्मिती

उद्याने ही शहराच्या विकासात व सौंदर्यात भर घालणारे : आ. संग्राजगताप

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः उद्याने ही शहराच्या विकासात व सौंदर्यात भर घालणारा विभाग आहे. या माध्यमातून जनतेच्या मनोरंजनाचे ठिकाण आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व परिवारातील इतर नागरिक विरंगुळ्यासाठी येत असतात. त्यांना महापालिकेच्या माध्यमातून चांगल्या सुविधा देणे आपले कर्तव्य आहे. यापुढील काळात नियोजन करुन चांगली उद्याने निर्माण करु. उद्यान विभागप्रमुख मेहेर लहारे यांनी चांगले काम करुन महालक्ष्मी उद्यानाचे रुपडे पालटण्याचे काम केले. याचबरोबर शहरातील आर्टिस्ट कलाकारांना महालक्ष्मी उद्यानामध्ये जागा उपलब्ध करुन दिली व त्यांच्या कलांना वावा देण्यासाठी 1 टन भंगार साहित्यातून 13 फूट उंचीचा बोटीवरचा मत्स्य शिल्प निर्मिती केल्याने मुलांच्या आकर्षणास नक्कीच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
   महालक्ष्मी उद्यान येथे नगर शहरातील कलाकारांनी 1 टन भंगार साहित्यातून 13 फूट उंचीचा बोटीवरचा माशाचे शिल्पाचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक रवींद्र तात्या बारस्कर, ज्येष्ठ नागरिक विलास ताठे, उद्यान विभागप्रमुख मेहेर लहारे, सामाजिक कार्यकर्ते संजय ढोणे, सचिन जाधव, बाबासाहेब गिरवले, निखिल वारे, सुमित कुलकर्णी, दीपक खेडकर, क्रषिकेश चांदगुडे, राहूल कांबळे, अतुल आळकुटे आदी उपस्थित होते.
    यावेळी महापौर वाकळे म्हणाले की, लोखंडी भंगाराच्या साहित्यातून नगर शहरातील शिक्षण घेत असलेल्या कलाकारांनी आकर्षक अशी मत्स्य शिल्प तयार केले. हे नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देण्यासाठी या पुढील काळात महापालिकेच्या माध्यमातून विविध चौकांमध्ये जनजागृती आशयाचे शिल्प उभे करण्यासाठी मदत करू, असे ते म्हणाले.
   यावेळी बोलताना उद्यान विभागप्रमुख मेहेर लहारे म्हणाले की, उद्यान विभागाचा पदभार घेतल्यानंतर सर्व कर्मचार्‍यांना बरोबर घेऊन महालक्ष्मी उद्यानाची देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतले. रंगरंगोटीचे काम केले. याचबरोबर उद्यानत वाढलेले गवत काढले. याच बरोबर उद्यानामधील 5 वर्षांपासून बंद असलेला कारंजा सुरु केला. शहरातील इतर उद्यानेही टप्प्याटप्प्याने देखभाल व दुरुस्ती करू. शहरातील कलाकारांनी उभे केलेले हे शिल्प महालक्ष्मी उद्यानाच्या सौंदर्यात आणखी भर घालेल व आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल असा विश्वास पालिकेचे उद्यानप्रमूख मेहेर लहारे यांनी व्यक्त केला आहे. या शिल्पाची निर्मिती क्रषिकेश संजय चांदगुडे यांनी केली असून ते सध्या सर ज. जी. कलामहाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 103 व्या आर्ट सोसायटी ऑफ इंडिया तसेच बॉम्बे आर्ट सोसायटीसाठी त्यांच्या कलाकृतींची निवड झाली आहे. हे शिल्प साकारण्यात त्यांचे सहकारी राहूल कांबळे, अतुल आळकुटे, युसुफ यांनी मदत केली. या शिल्पातील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे यात पूर्णपणे उद्यानातील जुने पडून असलेले स्क्रॅप, जुन्या खेळण्या यात घसरगुंड्या, सी-सॉ, जुने लाईट्सचे पोल तसेच इतर खराब व गंजलेल्या काही खेळण्यांचा वापर वापर करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here