दलित महासंघाच्या भिंगार शहराध्यक्षपदी सुरेंद्रसिंग घारू यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 13, 2021

दलित महासंघाच्या भिंगार शहराध्यक्षपदी सुरेंद्रसिंग घारू यांची निवड

 दलित महासंघाच्या भिंगार शहराध्यक्षपदी सुरेंद्रसिंग घारू यांची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः दलित महासंघाच्या भिंगार शहर अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्रसिंग भुपेंद्रसिंग घारू यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र दलित महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील व जिल्हाध्यक्ष संजय चांदणे यांच्या हस्ते देण्यात आले. सुरेद्रसिंग भुपेद्रसिंग घारू यांची दलित महासंघ भिंगार शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना फेटा, श्रीफळ देवुन सैनिकनगर येथे सत्कार करण्यात आला. या वेळी  माजी सरपंच व दलित महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा अरुणाताई कांबळे, मनोहर अढागळे, अशोक डावरे, विकी कांबळे कुमार लोखंडे, सूरज उमाप हे उपस्थित होते. सुरेंद्रसिंग वारु यांची या पदावर निवड झाल्याने दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. सुरेंद्रसिंग वारु यांनी यापुर्वी अनेकवेळा दलितांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे.

No comments:

Post a Comment