नगर तालुका पंचायत समितीत खांदेपालट ? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

नगर तालुका पंचायत समितीत खांदेपालट ?

 नगर तालुका पंचायत समितीत खांदेपालट ?

सभापती उपसभापतींचे पक्षश्रेष्ठींकडे राजीनामे
  नगर तालुका शिवसेनेने सभापती पदाचा मान दिला . तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे पद पणाला लावले . मात्र कोरोनामुळे 9 महिने काहीच करता आले नाही . खुप काही करायचे बाकी आहे .पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल.
                                                                            - कांताबाई कोकाटे
                                                                   सभापती , नगर पंचायत समिती
  नगर तालुका शिवसेना व कॉग्रेसमुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य  माणसाला जनतेची सेवा करता आली. पण ठरलेल्या निर्णयानुसार पक्षाकडे राजीनामा दिला आहे .कोरोना कार्यकाळ नसता तर खुप योजनाची अंमलबजावणी करता आली असती.आम्हाता कार्यकाळ कमी पडला तरी पक्षश्रेष्ठीं जो निर्णय घेतील तो मान्य असेल.  
                  - रविंद्र भापकर,
       उपसभापती , नगर पंचायत समिती

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुका पंचायत समितीच्या सभापती कांताबाई कोकाटे व उपसभापती रवींद्र भापकर यांनी पक्षश्रेष्ठींना दिलेला शद्व पाळत आपल्या पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सपुर्द केला आहे.  यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.नगर तालुका पंचायत समितीत शिवसेना - काँग्रेस यांची महाआघाडी आहे. सव्वा वर्षापूर्वी पंचायत समितीत सभापती व उपसभापती निवडताना पक्षश्रेष्ठींनी सव्वा -सव्वा वर्षांचा फॉम्युला समोर मांडला होता. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा . शशिकांत गाडे, जि .प. चे उपाध्यक्ष प्रताप शेळके, कॉग्रेंसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, माजी सभापती संदेश कार्ले व बाळासाहेब हराळ यांच्या बैठकीत हा सव्वा -सव्वा वर्षांचा फॉम्युला ठरला होता.यानुसार सभापती कोकाटे व उपसभापती भापकर यांनी तालुक्यातील पक्षश्रेष्ठींकडे आपल्या पदाचा राजीनामा देऊन शद्व पाळला आहे. मात्र पक्षश्रेष्ठींनी याबाबत अद्याप त्यांचा राजीनामा स्विकाराला नसुन याबाबत बैठका घेऊन मते जाणुन घेण्यात येत आहे.
   उपसभापती रवींद्र भापकर यांना कमी कार्यकाळ मिळाला आहे. सव्वा वर्षाच्या काळात कोरोना महामारीमुळे जास्ती जास्त योजनांची अंमलबजावणी झाली नाही. उरल्या सुरल्या काळात शेतकरी हिताची कामे करण्यात त्यांची तारांबळ उडाली. अनेक त्यांना यापुढील काळात आणखी सेवा करण्याची संधी मिळावी व त्यांना पक्षश्रेष्ठींनी योग्य तो न्याय द्यावा अशा मागणीचा सूर रुईछत्तीसी, मठपिंप्री, हातवळण, गुणवडी, वाळकी, गुंडेगाव, दहिगाव साकत, शिराढोण वाटेफळ, यासह आदी गावातील नागरिकांनी आळवला आहे.

No comments:

Post a Comment