‘मास्क’ला विरोध! कोरोना चा महाविस्फोट! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 25, 2021

‘मास्क’ला विरोध! कोरोना चा महाविस्फोट!

 जिल्ह्यात 24 तासांत 1336 नव्या रुग्णांची नोंद.

‘मास्क’ला विरोध! कोरोना चा महाविस्फोट!
‘दैनिक नगरी दवंडी’चा रिअलिटी चेक ः तुरळक चेहर्‍यांवर मास्क.. कोरोनाची भिती गायब.
  चोवीस तासात आढळून आलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे- नगर मनपा - 457, संगमनेर - 148, राहाता 140, कोपरगाव - 101, अकोले- 74, शेवगाव - 71, श्रीरामपूर - 69, नगर ग्रामीण - 51,  पारनेर 46, जामखेड - 37, पाथर्डी 30, राहुरी 26, नेवासा 24, श्रीगोंदा 19, बाहेरील जिल्हा 16, कर्जत 15, कॅन्टोन्मेंट बोर्ड 14.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः कोरोना व्हॅक्सिंन आले म्हणून आलेला गाफीलपणा, मास्क वापरण्याबाबतचा हलगर्जीपणा, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता दुकानांमध्ये होणारी गर्दी यामुळे नगर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक ठरत आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात तब्बल 1338 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यात महानगरपालिका हद्दीतील 457 नवीन रुग्ण आहेत. शासकीय रुग्णालयातील लॅबमध्ये 511, खाजगी लॅब तपासणीत 655, रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 172 नवीन रुग्ण ही या 24 तासातील आकडेवारी, जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे मास्कचा वापर न करणे.. दै नगरी दवंडी प्रतिनिधीने केलेल्या रियालिटी चेक मध्ये मोठ्या संख्येने नगरकर मास्क न लावलेले आढळले. मास्कचा वापर होत नसल्याने कोरोनाचे रुग्ण रोज वाढु लागले आहेत, जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन या सर्व यंत्रणांनी याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.
   जिल्ह्यात आज एक हजार पेक्षा जास्त कोरोना बाधित आढळत असताना नगरकर मास्क लावायला तयार नाही. विशेष म्हणजे प्रत्येकाचे मास्क न लावण्याची जगावेगळी कारणं आहेत. काहीचे तर्क तर असे आहेत की जागतिक आरोग्य संघटनाही त्यासमोर नतमस्तक होईल. असे असताना ही प्रशासन मास्क न लावणार्‍यांविरोधात थातुरमातुर कारवाई करत आहे. पोलीस व महापालिका मास्क न लावणार्‍या बेजबाबदार नागरिकांवर मेहरबान का आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
   शहरातील कोणत्याही बाजारपेठेत गेल्यावर मास्क न लावलेले नमुने पाहायला मिळतात. जिल्ह्यात 1 हजार 338 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी एकट्या शहराचा वाटा 457 रुग्णांचा आहे. असे असताना ही नगरकरांचे मास्क न लावण्याचे जगावेगळे कारण आहेत. मास्क न लावणार्‍यांना प्रश्न विचारताच अशी कारण नगरकरांनी पुढे केली की खुद्द थकज ही घायाळ झाल्या शिवाय राहणार नाही. काहींना कुठे ही कोरोना आहे असे वाटत नाही. पंतप्रधानांच्या बंगालमधील
   रॅलीत कोरोना नाही, शेतकर्‍यांच्या आंदोलनात कोरोना ही नाही, मग नगरमध्येच कोरोना कसा असा या मास्क न लावणार्‍या सवाल आहे. तर काहींचे आताच नाश्ता केला, आताच चहा प्यायलो म्हणून मास्क लावलेला नाही असे उत्तर तयार असतात.
फोनवर बोलताना मास्क काढायची गरज नाही. फोनवर बोलताना मास्क नकोय. तर एका किराणा दुकानदाराने तर मास्क लावल्याने चक्क नाकातून घाम येते असे सांगत दुकानाच्या शटर सारखे मास्क ही वरखाली करत राहतो असे जगावेगळे उत्तर दिले. तर काहींनी तर ते कोरोनाला पाहून जेवढे घाबरत नाही तेवढे ते पुढे कॅमेर्‍याला पाहून घाबरले आणि चक्क पळ काढला. तर काहींनी कॅमेरा पाहून त्वरित मास्क घालत मग मास्क का लावले पाहिजे असे तत्वज्ञान इतरांसाठी दिले. तर काही महाभाग सकाळी फिरायला जाताना मास्क कशाला शुद्ध हवा कशी मिळेल असे सांगतात इतर सर्वांनी मात्र मास्क घालावे यावर चक्क लांबलचक लेक्चर दिले.
    मास्क न लावणारे काही नगरकर केमेरा पाहून असे लाजले की त्यांनी पळच काढला. तर काहींनी तापमानाचं कारण पुढे केला. एक महाभाग तर पाठीत जखम झाल्याने दुखतोय म्हणून मास्क लावत नसल्याचा कारण पुढे केलं.  काही वृद्ध स्वतःचा जीव धोक्यात घालून गर्दीत मास्क विना फिरताना आढळले. आणि नगरी दवंडी प्रतिनिधीने प्रश्न विचारताच माझी तब्येत बरी नाही डॉक्टरकडे जातोय असे कारण पुढे केले. मात्र, डॉक्टर सांगतात मास्क लावा असे सांगताच खिशातून मास्क काढून लावले.
   नगरकर नागरिक मास्कचा नियमांचा सर्रास उल्लंघन करत असल्याचे पाहिल्यानंतर जिल्हात कोरोना का पसरतोय हे लक्षात आलेच असेल. आता जरा खुद्द महापालिका व पोलीस प्रशासन मास्क न लावणार्‍याविरोधात काय कारवाई करत आहेत हे ही पहावं लागेल.

No comments:

Post a Comment