अहमदाबादच्या हुंडाबळी प्रकरणाचा समाजवादी पार्टीच्या वतीने निषेध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

अहमदाबादच्या हुंडाबळी प्रकरणाचा समाजवादी पार्टीच्या वतीने निषेध

 अहमदाबादच्या हुंडाबळी प्रकरणाचा समाजवादी पार्टीच्या वतीने निषेध

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  हुंड्यासाठी मानसिक त्रास देऊन अहमदाबाद येथील महिलेला आत्महत्या करण्यास भाग पाडणार्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. तर सदर घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे,  जहीर सय्यद, हुसैन शेख (मुन्नाभाई), राजेंद्र गायकवाड, तौसीफ शेख, जाफर शेख, जैद सय्यद, जियान सय्यद, मुबीन सय्यद आदी उपस्थित होते.
   अहमदाबाद येथील 23 वर्षीय आयशा आरिफ नावाच्या महिलेने साबरमती नदीत उडी घेऊन आपले आयुष्य संपवले. तीने काढलेले व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मयत आयशा यांचा लग्न दि.6 जुलै 2018 मध्ये झाला. तेंव्हापासून माहेरचे लोक मुलीला हुंड्यासाठी छळ करुन तीला मारहाण करीत होते. या छळाला कंटाळून सदर महिलेने दि.25 फेब्रुवारी 2021 रोजी आत्महत्या केली. हुंड्यासाठी महिलेचा छळ करणार्या सासराच्या सर्व व्यक्तींवर हुंडा बळी कायद्यातंर्गत कारवाई करुन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्या महिलांचे हुंड्यासाठी पिळवणुक व छळ होत असेल, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजवादी पार्टी पुढाकार घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment