नगर शहर विकासासाठी तरुणांच्या मागे उभा राहणार- बाबुशेठ टायरवाले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

नगर शहर विकासासाठी तरुणांच्या मागे उभा राहणार- बाबुशेठ टायरवाले

 प्रभाग 2 मधील वीर सावरकर मार्ग ते जयहिंद चौक रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ

नगर शहर विकासासाठी तरुणांच्या मागे उभा राहणार- बाबुशेठ टायरवाले

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अहमदनगर शहराचे तत्कालीन अपक्ष आमदार स्व.नवनीतभाई बार्शीकर यांनी शहर विकासाचा पाया रोवला आता तरुण आमदार संग्राम जगताप यांनी कळस उभारणीचे काम हाती घेतले आहे. प्रभागातील तरुण-तडफदार नगरसेवकांची कामे जोरात सुरु आहे. नगर शहर व प्रभागाच्या विकासासाठी या तरुणांच्या मागे उभा राहणार, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते बाबूशेठ टायरवाले यांनी केले.
   प्रभाग क्र.2 मधील वीर सावरकर मार्ग ते जयहिंद चौक पर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ श्री.टायरवाले यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आ.संग्राम जगताप, नगरसेविका रुपालीताई वारे, संध्याताई पवार, नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, देवदत्त पाउलबुधे, आर.बी.रक्ताटे, एस.एल.तांबे, रत्नाकर बडे, राजू नायर, यशवंत तवले, रविंद्र पाखले, अर्जुन आठरे, महेश रासकर  आदि मान्यवर उपस्थित होते.
   श्री. टायरवाले पुढे म्हणाले, नगर शहर हे एक खेडेगाव आहे, असे आजही संबोधले जाते, पण शहराला आता तरुण नेतृत्व लाभले. प्रभागामध्ये तरुण नगरसेवक निवडून दिले. सध्या यंग जनरेशन आहे, त्यामुळे शहर विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. यासर्व तरुणांच्या मागे पाठबळ देण्याचे काम आम्ही करु, असे म्हणाले. प्रास्तविकात निखिल वारे म्हणाले, शहरातील एकूण 17 प्रभागामध्ये प्रभाग 2 हा खूप मोठा असूनही आम्ही चारही नगरसेवक आ.जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली खूप कामे मंजूर करुन घेतली. ड्रेनेज, रस्ते, पाणी प्रश्न ही कामे प्रभागात सुरु आहेत. नागरीकांचे सहकार्य, आ.जगताप यांचे योगदान त्यामुळे प्रभागातील प्रश्न सोडवून विकासाला गती मिळाली, असे ते म्हणाले. आ.संग्राम जगताप म्हणाले, प्रभाग दोन मधील चारही नगरसेवक कर्तव्यदक्ष, कार्यक्षम असून, छोटी-छोटी कामे देखील कशी पूर्ण होतील, याकडे ते बारकाईने लक्ष देत आहेत. त्यामुळे या भागातील कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले.     नगरसेविका रुपालीताई वारे, संध्याताई पवार, नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके यांनी मनोगते व्यक्त केली.  यावेळी नागरिकांनी आ.संग्राम जगताप व चारही नगरसेवकांच्या कामांबद्दल समाधान व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी स्नेहल कुलकर्णी, शेखर डोक्रस, रविंद्र राऊत, दिपक रेखी, रवि वारे, सचिन गाडे, सचिन लोटके, बिभिषण अनभुले, रविंद्र पहिलवान, सुधाकर देशपांडे, शुभदा कस्तुरे, स्तिमा नायर, अलका म्हसे, शरयू तवले, अनुराधा होशिंग, स्मिता कामबलत, निलांबरी मोडक आदिंसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment