विकेन ते पिकेन या योजनेत महिला शेतकर्‍यांना सक्षमीकरण करणार- नवले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

विकेन ते पिकेन या योजनेत महिला शेतकर्‍यांना सक्षमीकरण करणार- नवले

 विकेन ते पिकेन या योजनेत महिला शेतकर्‍यांना सक्षमीकरण करणार- नवले


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः महिला शेतकर्‍यांनी शेती उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करावेत. त्या माध्यमातून कुटुंबाला चांगला आर्थिक हातभाल लागू शकतो. शेतकर्यांच्या उन्नतीसाठी प्रक्रिया उद्योग ही आजची गरज आहे. जास्तीत जास्त महिला शेतकर्यांना विकेल ते पिकेल या योजनेत सहभागी करून घेऊन त्यांच्या फळे, भाजीपाला आदी शेतीमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. या योजनेत महिला शेतकर्यांना सहभागी करून घेऊन त्यांचे सक्षमीकरण केले जाईल. मधुमक्शिका पालन करून कांदा बीजोत्पादन, फळ पीके यांचे उत्पादन वाढीसाठी फायदा होतो, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी केले.
   जागतिक महिला दिनानिमित्त नगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथे कृषी विभागाच्या वतीने आत्मा अंतर्गत महिलांसाठी मधुमक्शिका पालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास महिला बचतगटाच्या सदस्यांना टाकळी काझीच्या सरपंच सुनीता ढगे, सारोळा बद्दीचे सरपंच सचिन लांडगे, मधुमक्शिका पालन प्रशिक्षक नानासाहेब इंगळे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, कृषी सहाय्यक बाळासाहेब जावळे, ‘आत्मा’चे सहाय्यक तंत्र व्यवस्थापक उमेश डोईफोडे, श्रीकांत जावळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
   श्री. नवले पुढे म्हणाले की, मधमाशा पालन हा उद्योग शेतीपूरक व्यवसाय असून, यासाठी शेतकर्यांना शासनाच्या वतीने मदत केली जाते. संपूर्ण देशी तंत्रज्ञ व सर्वांना हा व्यवसाय करता येतो. इतर उद्योगांशी स्पर्धा न करणारा हा एकमेव उद्योग आहे. मधुमक्शिका पालनामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, तसेच नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी मदत होते, असे सांगितले.
   प्रशिक्षक नानासाहेब इंगळे म्हणाले की,  मधमाशा मध तयार करतात. मध हे एक अत्यंत शक्तीदायक व पौष्टीक अन्न व औषध आहे. मधमाशा मेण देतात. हे सौंदर्य प्रसाधने, औद्योगिक उत्पादनाचा घटक आहे. मधमाशांपासून मिळणारे राजान्न (रॉयल जेली, दंश, विष, व्हिनम) पराग (पोलन) रोंगणे (प्रो पॉलीस) पदार्थांना उच्चप्रतीचे औषधमूल्य आहे. परागी भवनाव्दारे शेती, पिके, फळबागायती पिकांच्या उत्पादनात भरीव वाढीस मदत होते. यावेळी सरपंच सुनीता ढगे, सचिन लांडगे आदींनीही मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment