धार्मिकता वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे : वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 13, 2021

धार्मिकता वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे : वाकळे

 धार्मिकता वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे : वाकळे

नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्यावतीने काळभैरवनाथ देवस्थानला साऊंड सिस्टीम भेट

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः आपली भूमी ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. या भूमीमध्ये आजच्या युवापिढीला साधू-संतांच्या विचारांची खरी गरज आहे. आजचा युवक हा डिजिटल युगामध्ये वावरत असताना दिवसेंदिवस धार्मिकतेचा विसर होत चालला आहे. युवकांमध्ये धार्मिकतेची आवड निर्माण व्हावी, यासाठी मंदिरांमध्ये आरती, हरिपाठ, भजन, किर्तनाचे आयोजन करुन धार्मिकता वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मंदिराच्या माध्यमातून धार्मिकता निर्माण होऊन समाजामध्ये एकोपाची भावना निर्माण होते. बोल्हेगाव येथील काळभैरवनाथ हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असून, यासाठी प्रभाग 7 मधील बोल्हेगाव येथील काळभैरवनाथ मंदिरातील भजनी मंडळाला संपूर्ण साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली. या माध्यमातून परिसरातील नागरिक एकत्र येऊन विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जातील व यातून एक आनंदी व उत्साही वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी केले.
   यावेळी हभप दत्तात्रय घोगरे महाराज, हभप राधाकिसन कातोरे महाराज, हभप दादा रोहोकले महाराज, हभप भिमसेन महाराज कोलते, हभप भास्कर वाकळे महाराज, हभप मारुती काटे, पुजारी मामा, रामकिसन बामदळे, बाळासाहेब वाकळे, ज्ञानदेव कापडे, रावसाहेब वाटमोडे, दत्तु अप्पा, राजू वाकळे, संतोष वाटमोडे, बाबाजी वाकळे, विलास ससे, संपत वाकळे, बाळू वाकळे, अरुण ससे, पोपट वाटमोडे, गोरख वाटमोडे, बबन वाकळे, रमेश वाकळे, सुभआ, वाकळे, शिवाजीराव कराळे, एकनाथ कराळे, रंगनाथ गवळी, अविनाश लेंढे, बाबासाहेब पाडळे, सोमनाथ कराळे, अँड. मावळे, सावळेराम कापडे, दिलीप वाकळे, दगडू वाटमोडे, पंकज लोखंडे, किसन कोलते, भैरवनाथ वाकळे, कांतीलाल वाकळे, करण वाकळे, बापू आरडे, कचरु वाकळे, रंगनाथ वाटमोडे, आसाराम कराळे आदी नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment