कल्पतरू हाऊसिंग सोसायटीच्या रस्त्याचे काम 35 वर्षानी मार्गी लागली- नगरसेवक स्वप्नील शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

कल्पतरू हाऊसिंग सोसायटीच्या रस्त्याचे काम 35 वर्षानी मार्गी लागली- नगरसेवक स्वप्नील शिंदे

 कल्पतरू हाऊसिंग सोसायटीच्या रस्त्याचे काम 35 वर्षानी मार्गी लागली- नगरसेवक स्वप्नील शिंदे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः प्रभाग 4 चे विकासकामातून रूप बदलणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रभागामध्ये विविधकामे प्रलंबित होती. ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे विकास कामासाठी मोठा निधी उपलब्ध झाला कल्पतरू हाऊसिंग सोसायटीमध्ये गेली 35 वर्षामध्ये पहिल्यांदा या रस्त्यांचे काम होत आहे. रस्ता नसल्यामुळे या सोसायटीमध्ये नागरिकांचे हाल होत होते. रस्त्याच्या उद्घाटना प्रंसगी लगेच रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर या भागातील नागरिकांना रस्त्याचे काम होणार आहे हे पाहून नागरिकांना आंनदअश्रु अनावरण झाले. नागरिकांनी मोठ्या विश्वासाने आम्हाला निवडून दिले आहे. विकासकामातून नागरिकांचा विश्वास संपादन केला असल्यांचे प्रतिपादन नगरसेवक स्वप्निल शिंदे यांनी केले.
   प्रभाग क्रं 4 चे नगरसेवक स्वप्निल शिंदे यांच्या प्रयत्नातून कल्पतरू हाऊसिंग सोसायटी रस्ता कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ सपन्न झाला. यावेळी उद्योजक अमोल गाडे, सुमित कुलकर्णी, सचिन जगताप, रोहन सानप, अमित गटणे, क्रषीकेश देशमुख, सुरज कुरलिये, सुनिता नलगे, लता पाटेकर , मनिषा तांदळे, विद्या हाजारे, हर्षल झाबंरे, विवेक भोसले, चंद्रकात केळकर, महेश कुलकर्णी, राजेंद्र भुजबळ, सुशिल शिरसाठ, अंबादास तांदळे, मिलिंद डहाळे, लकीसिंग खुबचंदानी, प्रविण हजारे, सोहम वारूळे, राजकुमार जांगिड, एच.एस. झाबंरे, आदीसह नागरिक उपस्थित होते.
   अमोल गाडे म्हणाले की, प्रभागाचा नियोजन पद्धतीने कारभार करण्यासाठी विकासआराखड्याची खरी गरज आहे. या माध्यमातून प्रभागातील मुलभूत प्रश्न सोडविण्यास मदत होते आणि वारंवार कामे करण्याची गरज पडत नाही या माध्यमातून दर्जेदार कामाकडे विशेष लक्ष केंद्रीत करता येते. त्यामुळेच प्रभाग 4 मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. असे ते म्हणाले. महेश कुलकर्णी म्हणाले की, कल्पतरू सोसायटीचे स्थापना 1985 साली झाली. तेव्हापासून आजतागायत आम्हाला रस्ता नव्हता मात्र आमच्या नगरसेवकांनी हा रस्ता करून दिला आहे. रस्ता होईपर्यंत आम्हाला विश्वास नव्हता कारण अनेक वेळा खडी टाकली जायची व परत उचलून नेली जायची रस्त्याचे काम केल्याबद्दल नगरसेवकांचे आभार मानतो.

No comments:

Post a Comment