जेऊर परिसरात महिला दिन उत्साहात साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

जेऊर परिसरात महिला दिन उत्साहात साजरा

 जेऊर परिसरात महिला दिन उत्साहात साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जेऊर-नगर तालुक्यातील जेऊर परिसरात विविध ठिकाणी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त जेऊर ग्रामपंचायत मध्ये महिला ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य शैलेश सदावर्ते यांनी महिला दिनाविषयी माहिती सांगितली. महिलांनी आपल्या न्याय हक्कासाठी केलेल्या संघर्षाच्या स्मरणार्थ 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. न्युयॉर्क येथे सुरू झालेला महिला दिन आज सर्व देशात साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. यावेळी सदावर्ते यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगुन महिलांचा आदर करण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच राजश्री मगर, ग्रामविकास अधिकारी सविता लांडे, बाबासाहेब मगर, माजी उपसरपंच बंडू पवार, उपसरपंच श्रीतेश पवार, आप्पा बनकर, अण्णासाहेब मगर, ग्रा.स. अनिल ससे यांच्यासह सर्व महिला ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होत्या.
   इमामपूर येथे सरपंच भीमराज मोकाटे व ग्रामसेवक राहुल गांगर्डे यांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिला ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच भीमराज मोकाटे यांनी महिला दिनाचे महत्त्व पटवून देत आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला कार्यरत असल्याचे सांगितले. जेऊरसह बहिरवाडी, ससेवाडी, धनगरवाडी, इमामपूर आदी ठिकाणी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here