अत्याधुनिक उपचारांमुळे कॅन्सर रूग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत : राजश्री घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

अत्याधुनिक उपचारांमुळे कॅन्सर रूग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत : राजश्री घुले

 अत्याधुनिक उपचारांमुळे कॅन्सर रूग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत : राजश्री घुले

डॉ.गरुड हॉस्पिटलमधील मोफत कॅन्सर तपासणी शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः कॅन्सर हा दुर्धर आजार असला तरी डॉ.गरूड कॅन्सर हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपचार सुविधांमुळे कॅन्सरला प्रतिबंध करता येवू शकतो हा विश्वास रूग्णांमध्ये निर्माण झाला आहे. डॉ.गरूड यांचा 35 वर्षांपासूनचा अनुभव, तज्ज्ञांची टिम आणि अत्याधुनिक सोयी सुविधा यामुळे कॅन्सर तपासणी व दर्जेदार उपचार नगरमध्येच उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे नगर तसेच शेजारील जिल्ह्यातील रूग्णांची मोठी सोय झाली आहे. महिलांमध्ये कॅन्सर जागृती करण्यासाठी हॉस्पिटलने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. डॉ.गरुड यांच्या रुपाने कॅन्सर रूग्णांना देवदूतच भेटले आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील यांनी केले.
   जागतिक महिला दिनानिमित्त डॉ.गरूड कॅन्सर हॉस्पिटल व अहमदनगर रोटरी मिडटाऊनच्यावतीने महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षा घुले बोलत होत्या. यावेळी कॅन्सर सर्जरी तज्ज्ञ डॉ.प्रकाश गरुड, कॅन्सर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.पद्मजा गरुड, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष क्षितीज झावरे, योगतज्ज्ञ डॉ.योगिता सत्रे, हॉस्पिटलचे सीईओ ऍड.अभय राजे, किरण कालरा, शशी बिहाणी,  ज्येष्ठ महिला रूग्ण शशिकला बागडे आदी उपस्थित होते. शिबिरात एकुण 137 महिला रूग्णांची तपासणी करण्यात आली.
   डॉ.पद्मजा गरुड म्हणाल्या की, डॉ.गरुड कॅन्सर हॉस्पिटल 35 वर्षांपासून कॅन्सरग्रस्तांवर यशस्वी उपचार करीत आहे. येथे सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया, कॅन्सर केमोथेरपी, रेडियोथेरपी, मॅमोग्राफी तपासणी उपलब्ध आहेत. महिलांमधील स्तनाचा व गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण सध्या वाढत आहे. यादृष्टीने याठिकाणी अचूक निदान व प्रभावी उपचार करण्यात येतात. पॅपस्मीअर, कॉल्पॉस्कोपी, बायॉप्सी याव्दारे टेस्ट करून कॅन्सरचे निदान लवकर होते. रेडिएशनचे अत्याधुनिक अमेरिकन मशिनही येथे उपलब्ध आहे. महिलांमधील स्तनाचे व गर्भाशयाच्या कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास योग्य उपचारांमुळे रूग्ण पूर्ण बरा होवू शकतो. यासाठी महिलांनी सजग राहून न घाबरता आवश्यक तपासण्या करून घेतल्या पाहिजे. कॅन्सर प्रतिबंधासाठी जीवनशैलीत आवश्यक बदल करून योग्य आहार, नियमित व्यायाम केला पाहिजे. डॉ.योगिता सत्रे यांनी निरोगी व आनंदी जीवनासाठी योग प्राणायामाचे महत्व विशद करीत  योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे असे आवाहन केले. डॉ.प्रकाश गरुड यांनी सांगितले की, केंद्र शासनाची प्रधानमंत्री जीवन आरोग्य विमा योजनेंर्तत रेडिओथेरपीसह कॅन्सरचे सर्व उपचार मोफत उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रेडिओथेरपी लाईटसह कॅन्सर शस्त्रक्रिया, केमोथेरपी हे सर्व उपचार मोफत केले जातात. गरूड कॅन्सर हॉस्पिटलमधील रेडिओ थेरपी तज्ज्ञ डॉ.जगदीश शेजूळ हेही पूर्णवेळ उपलब्ध आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड.अभय राजे यांनी केले. मोहिनी धुमाळ व लक्ष्मी दावणपेल्ली यांनी आभार मानले. या शिबिरात 137 महिला रूग्णांची तपासणी करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here