फाईव्ह स्टार मानांकन नक्कीच मिळऊ - हर्षा नारखडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 3, 2021

फाईव्ह स्टार मानांकन नक्कीच मिळऊ - हर्षा नारखडे

 फाईव्ह स्टार मानांकन नक्कीच मिळऊ - हर्षा नारखडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियान व राज्य सरकारचे माझी वसुंधरा अभियानाचे मनपाने संपूर्ण तयारी पूर्ण केली असून, आपले शहर आता फाईव्ह स्टार
मानांकनासाठी सज्ञ़ झाले आहे. लवकरच कोणत्याही दिवशी केंद्र व राज्य सरकारचे पथक शहरात येऊन पाहणी करणार आहे.आपण स्वच्छ भारत अभियानामध्ये फाईव्ह स्टार मानांकन नक्कीच मिळवू असा विश्वास राज्य सरकार च्या प्रकल्प अधिकारी हर्षा नारखडे यांनी व्यक्त केला.
प्रकल्प अधिकारी हर्षा नारखडे यांनी सार्वजनिक स्वच्छता गृहाची पाहणी केली. याचबरोबर भाजी बाजारातील नागरिकांशी विविध प्रश्न विचारून चर्चा केली. या प्रसंगी त्या बोलत होत्या. शहरातील नागरिकांनी समाधानकारक  उत्तरे देऊन महापालिकेला सहकार्य करावे. याचबरोबर रस्त्यावर कोणीही कचरा टाकू नये. नगर शहर हे स्वच्छ सुंदर व हरित करण्यासाठी लोकसहभागाची खरी गरज आहे. महापालिकेचे कर्मचारी आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहे. तरी नगरकरांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, अशी माहिती स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख यांनी दिली. यावेळी प्रकल्प अधिकारी राहुल अहिरे, राजेंद्र सामल, लक्ष्मण लांडगे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here