ओला कात वाहणारा ट्रक पलटला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 5, 2021

ओला कात वाहणारा ट्रक पलटला.

 ओला कात वाहणारा ट्रक पलटला.

50 दुचाकीस्वार जखमी!


श्रीगोंदा ः
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव परिसरात सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दौड येथून नगरकडे ओला कात घेऊन चाललेला माजी आमदार भास्करराव जाधव यांचे मालकीचा एम.पी 09 एच.एच 4937 मालवाहतूक ट्रकला नगर दौड महामार्गावर अपघात होउन पलटी झाला. या अपघातात ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झाले. अपघातातील ट्रक मधील ओला कात रस्त्यावर पसरल्याने रस्त्यावरून जाणारे सुमारे 50 दुचाकीस्वार घसरून रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. या अपघाताबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
मिळालेल्या माहितीनुसार दौंड कडून नगर कडे ओला कात घेऊन जाणार्‍या मालवाहतूक ट्रक क्र.एम.पी 09 एच.एच 4937  ला सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ड्रायव्हरला झोप लागल्याने अपघात होउन ट्रक मधील ओला कात रस्त्यावर पडले. या अपघातात ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झाल्याने परिसरातील तरुणांनी उपचाराकरिता दाखल केले. ट्रक मधील ओला कात रस्त्यावर पडल्याने रस्त्यावरून जाणारे सुमारे 50 दुचाकीस्वार घसरून रस्त्यावर पडल्याने जखमी झाले.
या अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पो.ना.ज्ञानेश्वर पठारे, संतोष गोमसाळे, सचिन पठारे यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीने रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. रस्त्यावर पडलेले काताचे केमिकल श्रीगोंदा नगरपालिकेच्या व नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाड्या बोलाऊन धुऊन घेतले. अपघात झालेला ओला कात ट्रक हा कोकणातील माजी आमदार भास्करराव जाधव यांचा असल्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी सांगितले असून जाधव यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात संपर्क केला असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here