कोम्बिंग ऑपरेशमध्ये अट्टल गुन्हेगारास श्रीगोंदा पोलिसांनी केले जेरंबद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 26, 2021

कोम्बिंग ऑपरेशमध्ये अट्टल गुन्हेगारास श्रीगोंदा पोलिसांनी केले जेरंबद

 कोम्बिंग ऑपरेशमध्ये अट्टल गुन्हेगारास श्रीगोंदा पोलिसांनी केले जेरंबद

1 लाख रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकली जप्त

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः  श्रीगोंदा पोलीसांनी 23 मार्च रोजी रात्री काष्टी , वांगदरी मढेवडगाव परिसरात पोलिस पथकासह कोबींग ऑपरेशन राबवत रेकॉर्डवरिल सराईत अट्टल गुन्हेगार बाबुश्या चिंगळ्या काळे वय 21 वर्षे रा.वांगदरी याला वांगदरी शिवारात पकडला. त्याच्याकडून 1 लाख रुपये किंमतीच्या दोन मोटर सायकली जप्त केल्या. अधिक चौकशी केली असता त्याच्यावर शिरूर, खेड, लोणी काळभोर, श्रीगोंदा, यवत पोलिस ठाण्यात खून, दरोडा यासारखे भयंकर गुन्हे दाखल आहेत.
या बाबत सविस्तर असे की पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव, श्रीगोंदा पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली 23 मार्च रोजी रात्री काष्टी , वांगदरी मढेवडगाव परिसरात पोलिस पथकासह कोबींग ऑपरेशन राबवत रेकॉर्डवरिल सराईत अट्टल गुन्हेगार बाबुश्या चिंगळ्या काळे वय 21 वर्षे रा.वांगदरी याला वांगदरी शिवारात चोरीच्या सी डी डिलक्स मोटारसायकलसह ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता आरोपीने शिरुर येथुन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देत खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बुलेट मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 1 लाख रुपये किंमतीच्या दोन मोटर सायकली जप्त केल्या.
अट्टल गुन्हेगार बाबुश्या चिंगळ्या काळे याच्यावर लोणी कोळभोर, श्रीगोंदा, यवत, शिरूर, खेड, या पोलिस ठाण्यात खून, दरोडा या यासारखे भयंकर गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई स.पो.नि दिलीप तेजनकर , पो.हे.कॉ. अंकुश ढवळे , पो.हे.कॉ.मनोहर गावडे , पो.कॉ. प्रकाश मांडगे , पो.कॉ.गोकुळ इंगावले , पो.कॉ. किरण बोराडे , पो.कॉ. दादा टाके, पो.कॉ. सचिन म्हस्के यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment