माठांची विक्री रोडवल्याने कुंभार व्यावसायिक अडचणीत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

माठांची विक्री रोडवल्याने कुंभार व्यावसायिक अडचणीत

 माठांची विक्री रोडवल्याने कुंभार व्यावसायिक अडचणीत

 माठ बनवण्यासाठी लागणार्‍या मातीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच भुशाच्या किमतीही वाढ झाली असल्याने यंदाचा वर्षी माठाचा किमतीमध्ये 25 ते 30 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर आर. ओ. फिल्टर पाण्यामुळे देखील मागील 2 वर्षापासून माठांची विक्री रोडावली असल्याची खंत बेलवंडी येथील अशोक शिंदे या पारंपरिक कुंभार व्यावसायिकानी बोलावून दाखविली.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच गार पाण्यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणुन ओळखल्या जाणार्‍या माठाची मागणी वाढते यामुळे माठ विक्री व्यावसायिकांना यंदाच्या वर्षी तरी काहीसा दिलासा मिळणार असल्याचे चित्र सुरवातीला दिसत होते मात्र कोरोनाच्या दुसर्‍या टप्प्यामुळे माठ खरेदी करण्यास कोणीही येत नसल्याने गरिबांचा फ्रीज ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहे. या वर्षी मार्च संपतआला असला तरी माठ विकले न गेल्याने कुंभार समाजाचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.

मागच्या वर्षी उन्हाळ्याचा सिजन सुरू होताच कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि इतर व्यवसायांप्रमाणे कुंभार व्यवसायही अडचणीत आला होता. यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला माठ विक्री सुरू झाली असतानाच लोक फ्रिजचे पाणी पिण्याऐवजी माठातील पाण्याला अधिक पसंती देताना दिसुन येत असतानाच परत कोरोनाचा आलेख वाढतच चालल्याने ग्राहक घराच्या बाहेर पडत नसल्याने परत कुंभार व्यवसाय अडचणीत येतो की काय? अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यातच माठ बनवण्यासाठी लागणार्‍या मातीच्या दरामध्ये यंदाच्या वर्षी वाढ झाली आहे. तसेच भुशाच्या किमतीही वाढ झाली असल्याने यंदाचा वर्षी एका माठाचा किमतीमध्ये 20 ते 30 रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याचे माठ व्यावसायिकांनी सांगितले. आता सध्या मोठ्या प्रमाणात नळ असलेल्या माठांना ग्राहक चांगली पसंती देत आहेत. आता पुन्हा कोरोनाने उन्हाळाच्या सिजनमध्ये डोकेवर काढत असल्याने जर पुन्हा लॉकडाऊन झाले तर व्यवसाय होईल की नाही? याची चिंता सतवत आहे.
मागच्या वर्षी उन्हाळ्यात माती आणि भुसा मोठ्या प्रमाणात खरेदी करून माठ बनावले होते. मात्र, अचानक कोरोनासारख्या महामारीमुळे लॉकडाऊन झाले. यामुळे सर्वच जण घरात बसुन असल्याने माठकडे पाठ फिरवली. याचाच फटका पारंपरिक कुंभार व्यावसायिकांनाही बसला. यंदाच्या वर्षी तरी मागील वर्षी केलेला खर्च वाया गेलेला निघून येईल आणि दोन पैसे मिळतील, हीच अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करत आहे.

No comments:

Post a Comment