श्रीगोंदा पोलिसांचा पोलिस अधिक्षकांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मान. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 19, 2021

श्रीगोंदा पोलिसांचा पोलिस अधिक्षकांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मान.

 श्रीगोंदा पोलिसांचा पोलिस अधिक्षकांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मान.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडेवळीत येथे आढळलेल्या शीर नसलेला अनोळखी पुरुषाच्या खुनाचा तपास श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात लावत आरोपींना अटक केल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर येथे खास कार्यक्रमात श्रीगोंदा पोलिस निरीक्षक रामराव ढिकले आणि त्यांच्या टीमचा सन्मान केला.
अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडेवळीत येथे आढळलेल्या शीर नसलेला अनोळखी पुरुषाच्या खुनाचा तपास श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस अंमलदार अंकुश ढवळे,किरण बोराडे,दादासाहेब टाके, गोकुळ इंगवले, राजू भोर, प्रकाश मांडगे, किरण जाधव , अमोल कोतकर, विनायक जाधव, यांचा सन्मान पत्र देउन खास सन्मान केला. तर स्थानीक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांचा व कर्मचार्‍यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment