गळफास घेऊन विद्यार्थ्यांची आत्महत्या.पालकांनो सावधान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 5, 2021

गळफास घेऊन विद्यार्थ्यांची आत्महत्या.पालकांनो सावधान

 गळफास घेऊन विद्यार्थ्यांची आत्महत्या. 

महागडा मोबाईल न दिल्याने... पालकांनो सावधान


शेवगाव -
अन्न, वस्त्र, निवारा या मुख्य प्राथमिक गरजांबरोबर मोबाईल ही आता प्राथमिक गरज निर्माण झाली आहे. मोबाईल जवळ असेल तर मूलं तहान-भूक विसरून जात आहेत. मोबाईलचा किती अतिरेक झालाय हे दर्शविणारी ही घटना.पालकांनी महागडा मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून शेवगावमधील खंडोबा नगर मधील एका दहावीच्या विद्यार्थ्यांने गळफास लावून काल सायंकाळी आत्महत्या केली आहे. पालकांनी मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवावं हा इशारा या घटनेने दिला आहे. पालकांनो आता सावध व्हा या मोबाईलचा भस्मासुर तुमच्या घरात शिरतोय.
ओम दत्तात्रय वाघ (वय 16) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो येथील भारदे हायस्कूल येथे दहावीत शिक्षण घेत होता.याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात सुनील म्हस्के यांनी खबर दिली.ओमने आत्महत्या केल्याचे समजताच घरच्यांना व परीसरातील नागरिकांना एकच धक्का बसला. ओम वाघ याने त्याच्या घरच्यांकडे महागडा मोबाइल घेण्यासाठी हट्ट धरला होता. त्याला मोबाइल घेऊन न दिल्यामुळे तो नाराज होता. काल सायंकाळी त्याने राहत्या घरी छताला कंबरेच्या पट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेतला. साडेसातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here