राशीन येथील प्रांजल मंडलेचा सी. ए. परीक्षेत उत्तीर्ण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 24, 2021

राशीन येथील प्रांजल मंडलेचा सी. ए. परीक्षेत उत्तीर्ण

राशीन येथील प्रांजल मंडलेचा सी. ए. परीक्षेत उत्तीर्ण  


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राशीन ः राशीनमधील  मंडलेचा परिवारातील प्रांजल (मोनिका) प्रदीप मंडलेचा हीने नुकतीच  चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ही परीक्षा पुुणे येेेथे उत्तीर्ण झाली आहे.  कर्जत तालुक्यात मुलीमध्ये पहिली सीए होण्याचा मान प्रांजल हिने पटकावला असून तिचे राशीन  व परिसरात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.   प्रांजल ही जैन श्रावक संघाचे अध्यक्ष व किराणा मालाचे व्यापारी प्रदीप जीवराज मंडलेचा राशीन यांची मुलगी तसेच बालाजी उद्योग समूहाचे संचालक राहुल जीवराज मंडलेचा यांची पुतणी आहे. प्रांजलच्या यशात आई वडील व मंडलेचा परिवाराचे  मार्गदर्शन व
बहुमोल साथ मिळाली आहे, पुणे येथील सीए मिलिंदजी मुथा, सीए नीलमजी भंडारी व राशीन येथील स्टुडन्ट अकॅडमीच्या संचालिका सौ. दिपाली देशमाने यांचे वेळोवळी मार्गदर्शन मिळाले. प्रांजल हिचे प्राथमिक शिक्षण जि.प. प्राथमिक शाळा राशीन तसेच माध्यमिक शिक्षण श्री जगदंबा विद्यालय राशीन तसेच उच्च शिक्षण पुणे येथील नामांकित बीएमएसएस कॉलेज येथे पूर्ण झाले तिच्या या यशाबद्दल व्यापारी वर्ग, मित्रपरिवार, हितचिंतक का कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here