शिवजयंतीच्या वर्गणीतून रुग्णांना 94 हजाराची मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 5, 2021

शिवजयंतीच्या वर्गणीतून रुग्णांना 94 हजाराची मदत

 शिवजयंतीच्या वर्गणीतून रुग्णांना 94 हजाराची मदत

मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समितीचा स्तुत्य उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी येथिल मराठा बहुऊद्देशिय संस्था संचलित मराठा एकीकरण समिती आयोजित शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सालाबादाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरीत होवून समाजातील अडचणीत असलेल्या कुटूंबांना मदत केली.
वांबोरी येथील मंथना पागिरे या भगिनीचे पती भरत पागिरे जीवघेण्या अपघातात जायबंदी होऊन सुमारे एक वर्षांहून अधिक काळापासून बिछान्यावर आहेत.एक शस्रक्रिया झालेली.त्यांच्यावर डोक्याच्या कवटीची अजून एक शस्रक्रिया करणे बाकी होते.परंतु यापूर्वीच्या उपचारांसाठीच जवळचा सर्व पैसा संपला.नातेवाईकांनीही शक्य होईल तितकी मदत केली पण पतीचे औषधोपचार आणि मुलांच्या शिक्षणावर होणार्‍या खर्चामुळे या मायमाऊलीचा संसाराचा गाडा मेटाकुटीला आलेला.घरी शेतीवाडीही नाही किंवा उत्पन्नाचे दुसरे काहीही साधन नाही.त्यातच पतीच्या पुढील शस्रक्रियेची तारीख जवळ आलेली.दैनंदिन खर्च तर चुकत नव्हता.जवळ तर काहीच पैसे नाहीत.परंतु मंथनाताईंनी परिस्थितीपुढे हार न मानता जिद्दीने या अडचणीसोबत दोन हात करायचे ठरवले.शिकलेल्या असूनही त्या दुसर्‍यांच्या शेतात मजुरी करुन पैसे उभे करु लागल्या.दरम्यान राहुरी येथील मराठा बहुऊद्देशिय संस्था संचलित मराठा एकीकरण समितीचे अध्यक्ष देवेंद्र लांबे यांना वांबोरी येथिल आदिनाथ मोरे यांनी  पतीच्या उपचारांसाठी हतबल झालेल्या या माऊलीच्या संघर्षाची कहाणी सांगितली.
प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त समाजातील गरजू कुटूंबाना मदत करण्याचा  मराठा एकीकरण समिती आयोजित शिवजयंती उत्सव समितीच्या  वतीने उपक्रम राबविण्यात येत असतो.या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट वांबोरीला येऊन पागिरेताईंची भेट घेतली.प्रत्यक्ष पेशंटला भेटून त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि खात्री पटल्यानंतर सरळ निधी जमवायला सुरुवात केली.ज्या हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया होणार होती तेथील तज्ज्ञ डॉक्टरांशीही चर्चा करुन याबाबत माहिती घेतली.वांबोरी येथील संवेदनशील मनाचे डॉक्टर योगेश पानसरे यांनीही आत्तापर्यंत केलेल्या उपचारांबाबत माहिती तपशीलवार सांगून या पदाधिकार्‍यांना मोलाची मदत केली.शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर या बहिणीला मदत करता यावी म्हणून सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षातही आवाहन केले गेले.या सर्वांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत दोनच दिवसात 94000/- (चौरन्नव हजार रुपये) निधी गोळा झाला.
शिवजयंती उत्सव समिती पूर्ण कार्यकार्यणीचा मान यावर्षी महिलांना देण्यात आला होता.याच मराठमोळ्या महिलांनी देखील पुढे येऊन यावेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. शस्त्रक्रियेसाठी येणार्‍या एकूण खर्चाचा रु.63000/-  (त्रेसष्ठ हजार रुपये) मंथनाताईं पागिरे यांना थेट नगर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन या अश्विनी कल्हापुरे,वैशाली शेळके,राजश्री घाडगे,लगे सुजाता,रुपाली रासने,जानका लबडे,वर्षा लांबे,दिपाली अडसुरे,ज्योती नालकर,पुनम शेंडे  धनादेश दिला आणि शस्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.पेशंटच्या आणि मंथनाताईंच्या चेहर्‍यावर असलेली मराठा एकीकरण समितीच्या पदाधिकार्‍यांबद्दलची  कृतज्ञता यावेळी लपून राहिली नाही.

No comments:

Post a Comment