2 दरोडेखोर गजाआड 4 फरार रात्री दरोड्याच्या तयारीत असणारे... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 19, 2021

2 दरोडेखोर गजाआड 4 फरार रात्री दरोड्याच्या तयारीत असणारे...

 2 दरोडेखोर गजाआड 4 फरार रात्री दरोड्याच्या तयारीत असणारे...

मोबाईल,मिरचीपूड, बुलेट, पल्सर, तलवार, गलोल जप्त.


राहता ः पाण्याच्या पाटाच्याकडेला एका पत्र्याच्या शेडच्या आडोश्याला दरोड्याच्या तयारीत असणार्‍या दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले असुन दरोड्यासाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त केली आहेत.
सदर घटनेची हकीकत अशी की सराईत गुन्हेगार शुभम काळे रा. गणेश नगर, राहता हा त्याचे साथीदारांसह दरोड्याचे तयारीत असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना प्राप्त झाल्याने त्यांनी राहाता परिसरात सापळा लावला.त्यावेळी घटनास्थळी अंधारात 5 ते 6 इसम मोटार सायकलवर कुजबुज करताना दिसून आल्यानंतर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना गोलाकार घेराव घातला. पोलिसांना पाहताच ते पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करून शुभम काळे वय 21, भरत तानाजी काळे या दोघांना ताब्यात घेतले. तर अनिल काळे, अक्षय आव्हाड, गणेश तेलोरे, राहुल वाघमारे हे चार जण फरार झाले.

पकडलेल्या इसमांची अंगझडती झडती घेतली असता त्यामध्ये एक विना क्रमांकाची रॉयल इन्फिल्ड कंपनीची क्लासिक बुलेट, एक विना क्रमांकाची बजाज कंपनीची 220लल पल्सर मोटरसायकल, एक तलवार ,एक मोबाईल, एक गलोल, मिरची पूड असा एकूण 71,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला तो जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी हे दरोड्याची तयारी करून कोठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत मिळून आल्याने पोना संतोष शंकर लोंढे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
जप्त करण्यात आलेल्या दोन्ही मोटारसायकल ह्या नेवासा वाळुंज व  औरंगाबाद येथून चोरी केल्या असल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. बुलेट मोटारसायकल चोरीबाबत नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. पल्सर मोटरसायकल चोरी बाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन वाळुंज गुन्हा दाखल आहे.
ही कारवाही मनोज पाटील साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल साहेब अप्पर पोलिस अधीक्षक अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व संदीप मिटके उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, संतोष लोंढे, शंकर चौधरी, प्रकाश वाघ, संदीप दरंदले, राहुल सोळुंके, रोहित मिसाळ यांनी केली.

No comments:

Post a Comment