श्री.मुलिकादेवी महाविद्यालयात महिला दिन साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 8, 2021

श्री.मुलिकादेवी महाविद्यालयात महिला दिन साजरा

 श्री.मुलिकादेवी महाविद्यालयात महिला दिन साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः निघोज येथील श्री.मुलिकादेवी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या निमित्ताने महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की आज जागतिक पातळीवरील प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपला ठसा उमटविला आहे. आधुनिक काळातील महिला या खर्‍या अर्थाने आत्मनिर्भर बनलेल्या आहेत. कारण त्यांचा कष्टाळूपणा, स्वावलंबन या मुल्यामुळे महिला आघाडीवर पोहोचल्या आहेत. डॉ. मनोहर एरंडे यांनी यावेळी इतिहासातील दाखले देत अनेक कर्तुत्ववान स्त्रियांची उदाहरणे देत त्यांच्या कार्याचा वसा महिला आज पुढे नेत आहेत असे सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.सचिन निघुट,प्रा.मनीषा गाडीलकर, प्रा.विशाल रोकडे,डॉ. गोविंद देशमुख,प्रा. प्रविण जाधव,प्रा. अशोक कवडे,प्रा. रामदास खोडदे,प्रा. अक्षय अडसूळ,प्रा. प्रीती कार्ले,प्रा. आनंद पाटेकर,प्रा. अंजली मेहर,प्रा. दिपाली जगदाळे,प्रा.पोपट सुंबरे,  प्रा.प्रतिभा शेळके, प्रा. स्वाती मोरे,प्रा. संगीता माडगे,प्रा. नीलिमा घुले,प्रा. सतीश काकडे,प्रा. केशर झावरे,प्रा.जनाबाई घेमुड,प्रा. विशाल चव्हाण आदी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here