निलेश लंके प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 8, 2021

निलेश लंके प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

 निलेश लंके प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी पुढाकार,  आ. निलेश लंके यांची यशस्वी संकल्पपुर्ती!


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः निलेश लंके प्रतिष्ठान मुंबईचा  दुसरा  वर्धापन दिन कामोठे येथे रविवारी साजरा करण्यात आला.या निमित्ताने कोणताही दुसरा कार्यक्रम न घेता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून प्रतिष्ठाने सामाजिक बांधिलकी जपली. कोरोना काळात जास्तीत जास्त मतदान करून रक्ताचा तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न यावेळी रक्तदात्यांनी केला.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. सध्या कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण कमी असले तरी. हे संकट आजही कायम आहे. यासाठी मध्यंतरी टाळेबंदी सुद्धा घेण्यात आली होती. महाविद्यालयांना सुट्टी असल्याने रक्तदान शिबिरे आयोजित करता आले नाहीत. या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. नॉन कोविड रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया करण्यासाठीही रक्त आवश्यक आहे. रक्ताची गरज भागवण्यासाठी रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत.  निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने  7 मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. ज्ञानसाधना सभागृहात पार पडलेल्या या उपक्रमामध्ये मुंबईस्थित पारनेरकरांबरोबरच कामोठे वसाहतीतील नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.533 रक्तदात्यांनी निलेश लंके प्रतिष्ठान मुंबई च्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतिश पाटील, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुरदास गोवारी, नगरसेवक शंकर म्हात्रे, माजी नगरसेवक प्रमोद भगत, निलेश लंके प्रतिष्ठान चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, पारनेर तालुका अध्यक्ष बापूशेठ शिर्के, सचिन पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस अशोकशेठ घुले, मुंबई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेशशेठ धुरपते, कार्याध्यक्ष गोरखशेठ आहेर, सचिव नितीन शेठ चिकणे, उपाध्यक्ष गोविंद साबळे, कैलासशेठ पावडे, खजिनदार दिलीपशेठ  कोरडे , भाऊसाहेब आहेर, शंकरशेठ चिकणे, संजय बाबर,नवी मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सरचिटणीस निर्मला लटांबळे, सामाजिक कार्यकर्ते सुवर्णाताई हाडोळे, किरण जमदाडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. एमजीएम रक्तपेढी आणि कामोठे ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबीर पार पडले.

महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कामोठे येथे पार पडलेल्या रक्तदान शिबिरात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. रक्तदान करण्यासाठी मुलुंड, भांडुप, नेरुळ कल्याण-डोंबिवली, बोईसर भिवंडी या ठिकाणाहून रक्तदाते कामोठे येथे आले होते. त्यामध्ये महिलांचाही समावेश होता. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सावित्रीच्या लेकींनी रक्तदान करून इतरांसमोर वस्तुपाठ ठेवला. त्यांचे आमदार निलेश लंके यांनी अभिनंदन केले.

..........................
कोरोना वैश्वीक संकटाच्या पार्श्वभूमीवर निलेश लंके प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.आरोग्यमंत्र्याच्या प्रतिसादाला सकारात्मक आवाहन रक्तदात्यांनी दिले.प्रतिष्ठानच्या सर्व सहकारी मंडळींनी मोठया प्रमाणात रक्तदान घडवून आणले.भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम ते नक्कीच राबवतील .महिला भगिनीही रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जपली याचा मनोमन आनंद वाटला - आमदार निलेश लंके

..........................

ज्येष्ठ नागरिकांचाही रक्तदात्यांमध्ये समावेश
तरुणांबरोबरच  काही जेष्ठ नागरिकांनी सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.त्यापैकी काहींनी रक्तदान सुध्दा केले.त्यांनी घेतलेला पुढाकार कुतुहलाचा विषय ठरला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here