जागतिक महिला दिनी जिजामाता नारीशक्ती पुरस्काराचे पारनेरला वितरण... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 5, 2021

जागतिक महिला दिनी जिजामाता नारीशक्ती पुरस्काराचे पारनेरला वितरण...

 जागतिक महिला दिनी जिजामाता नारीशक्ती पुरस्काराचे पारनेरला वितरण...


पारनेर -
८ मार्च जागतिक महिला दिन या दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरण व महिला विकास या क्षेत्रात काम करणाऱ्या पी व्ही पी प्रतिष्ठान संचलित जिजामाता महिला बचत गट महासंघ व युवासेना पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० हिरकणीचा जिजामाता नारीशक्ती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन यांचा गौरव करण्यात येणार आहे .
पारनेर तालुक्यात प्रथमच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे .सेनापती बापट ,पाराशर ऋषी,संत निळोबाराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा,वारकरी,आदर्श गाव अशा विविध क्षेत्रात अग्रेसर असा तालुका येथे प्रथमच ह्या पुरस्काराचे आयोजन केले आहे जेणेकरून पुरस्कारार्थीना आपल्या कार्यात अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा व प्रेरणा मिळेल . त्यांच्या नावलौकिकात भर पडेल हा या पुरस्काराचा उद्देश आहे . 
सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्रक,शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असेल .या वर्षीचा हा पहिला पुरस्कार.१) ज्योतीताई देवरे  (कोरोना योद्धा)२) सौ . सुचिता ढवळे ( आरोग्य)३) कु . गौरी औटी ( न्याय विभाग )४) कु .राजश्री कोठावळे ( क्रिडा )५) सौ . योगिता घाटगे ( स्वच्छता )६)  विद्या गंधाडे ( कोरोना योद्धा )७) सौ . उषा चौधरी (महिला बचत गट )८) बेबी केंगार ( महिला संगोपन स्नेहालय )९) कु . कल्याणी औटी ( कृषी कन्या )१०) सौ . सुमनताई पोळ ( सांस्कृतिक कार्य ) यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती.
सौ .जयश्रीताई विजयराव औटी ( मा . पं . स . सभापती )
सौ .   ज्योती देवरे ( तहसिलदार, पारनेर )
सौ .   वर्षा नगरे (नगराध्यक्षा पारनेर न . पं .)
सौ . डॉ . वर्षा पुजारी (महिला आघाडी शहर प्रमुख शिवसेना)
सौ . कविता औटी (पारनेर शहर राष्ट्रवादी म . आ .)
सौ . रोहीणी वाघमारे (जिजाऊ महिला ब्रिगेड महाराष्ट्र राज्य)
 इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पारनेर तालुक्यातील १० मान्यवर पत्रकार बंधूंचा कोरोना योद्धा पुरस्कार  देऊन त्यांचाही गौरव करण्यात येणार आहे . ८ मार्च २०२१ रोजी आनंद लॉन्स कांदा मार्केट रोड, पारनेर येथे दु .३ वा .हा सोहळा पार पडणार आहे.

No comments:

Post a Comment