दुर्गम व आदीवासी भागांत पोहचली कोरोनाची लस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 26, 2021

दुर्गम व आदीवासी भागांत पोहचली कोरोनाची लस

 दुर्गम व आदीवासी भागांत पोहचली कोरोनाची लस

वनकुट्याचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांच्या प्रयत्नांना यश  

राज्यातील पहिलाच प्रयोग
देशभर ठराविक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना लसीकरणाची सुविधा करण्यात आली असून आदीवासी लोकांच्या अडचणी लक्षात घेउन वनकुटे येथे सुरू करण्यात आलेले लसीकरण हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांनी पुढाकार घेउन हे लसीकरण सुरू केल्याबददल आदीवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः दुर्गम भागातील आदीवासी तसेच वयोवृद्ध नागरीक कोरोना लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्या भागातच कोरोना लसीकरण करण्यासाठी वनकुट्याचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांनी आमदार नीलेश लंके यांच्यामार्फत केलेल्या प्रयत्नांना यश आले असून वनकुटे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरणास प्रारंभही झाला आहे.
वनकुटे तसेच परिसरात मोठया प्रमाणावर आदीवासी बांधव वास्तव्यास असून त्यांना कोरोना लसीकरणासाठी टाकळीढोकश्वर अथवा खडकवाडी येथे जाता येणे शक्य नव्हते. ठरावीक ठिकाणीच ही लस उपलब्ध असल्याने आदीवासी तसेच दुर्गम भागातील नागरीकांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. टाकळीढोेकश्वर अथवा खडकवाडीपर्यंत जाणार कसे हा प्रश्न देखील निर्माण झाला होता. वयोवृद्ध नागरीकांची प्रवासाचीही अडचण होती.

दुर्गम भागातील नागरीकांची अडचण लक्षात घेऊन वनकुट्याचे सरपंच अ‍ॅड. राहूल झावरे यांनी ही समस्या आमदार नीलेश लंके यांच्या कानावर घातली. लंके यांनी तात्काळ आरोग्य अधिकार्‍यांशी चर्चा करून दुर्गम भागातील आदीवासी बांधवांसाठी खास बाब म्हणून व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या होत्या. सरपंच अ‍ॅड. झावरे यांनी सबंधितांकडे पाठपुरावा केल्यानंतर बुधवारी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात प्रत्यक्ष लसीकरणास प्रारंभ झाला.
दुर्गम भागातून वनकुटे ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत नागरीकांना आणण्याची व्यवस्था सरपंच झावरे यांनी केली असून नागरीकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. लसीकरण करण्यासाठी कारभारी मुसळे 9552822646, काशिनाथ भगत 9921135150, रामदास शेलार 9011388541, नारायण गागरे 9730241597, भागा काळे 8888668832, गबाजी गुंजाळ 8010423616, विठ्ठल गुंजाळ 9730894576 यांच्याशी संपर्क करून आधार कार्ड नंबर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारी 244 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. राहुल झावरे, देवराम गागरे, नारायण गागरे, कारभारी मुसळे, काशिनाथ भगत, रामदास शेलार, बबन मुसळे, अण्णा गिरी, उत्तम खैरे, गबाजी गुंजाळ, साहेबराव गागरे, बबन साळवे, बबन गागरे, श्रीरंग ससाणे, वैदयकिय अधिकारी डॉ. संदीप देठे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अमोल झावरे,  औषध निर्माण अधिकारी स्वाती ठुबे, आरोग्य सेविका वंदना डेरे, प्रभाकर पवार, रामचंद्र पालवे, सर्व आशा सेविका, आशा गट प्रवर्तक आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment