सुलोचना भालेकर यांना आयसीटी मुंबईची पीएचडी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

सुलोचना भालेकर यांना आयसीटी मुंबईची पीएचडी

 सुलोचना भालेकर यांना आयसीटी मुंबईची पीएचडी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील वासुंदे सारख्या ग्रामीण भागात जन्माला आलेल्या एका तरुणीने जिद्द, चिकाटी व मेहनतीने इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल  टेक्नोलॉजी या मुंबई मधील रसायन तंत्रज्ञान  संस्थेत आपले नाव कोरले.  या तरुणीची ही कामगिरी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. डॉ.सुलोचना बाळासाहेब भालेकर असे या पीएचडी धारक तरुणीचे नाव आहे.तसेच त्यांनी नुकतीच  आयआयटी गेट 2021 या परीक्षेत  देखील यश मिळविले आहे. त्या सध्या मुंबई मधील कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कळंबोली येथे रसायनशास्त्र विभागात अध्यापनाचे कार्य करत आहे. पारनेर महाविद्यालयात बीएससी  ही पदवी घेतल्यानंतर बी.पी.एच.ई.सोसायटीज,अहमदनगर कॉलेज,अहमदनगर येथे रसायनशास्त्र या विषयात एमएससी ही पदवी  मिळवली .आता त्याच विषयात शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च  पीएचडी ही पदवी मिळवून  आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला,त्यांना पीएचडी ही पदवी प्रो. पंडित सर( व्हाईस चान्सलर आयसीटी मुंबई) यांच्या हस्ते मिळाली,तर मार्गदर्शन प्रो. एन सेकर सर यांचे मिळाले.त्यांच्या शैक्षणिक जीवनात पारनेर कॉलेजचे  डॉ. ठुबे सर , डॉ. थोपटे सर ,प्राचार्य डॉ आहेर सर तसेच अहमदनगर कॉलेजचे डॉ. खन्ना सर,प्रा. रोहकले सर ,डॉ. देशमुख सर,डॉ. कवडे सर ,डॉ.गायकवाड सर  यांचेही मार्गदर्शन लाभले .
यावेळी बोलताना भालेकर असे म्हणल्या की भालेकर आणि हिंगडे या दोन्ही परिवाराच्या  पाठबळामुळे हे शक्य झाले.
या यशाबद्दल माजी उपसरपंच महादू भालेकर, इंजिनीअर सूर्यभान भालेकर, पत्रकार दादा भालेकर, भाऊसाहेब हिंगडे  यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment