राज्यस्तरीय तेंग सूडो कराटे स्पर्धेत माहीन अय्याज राजे प्रथम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 22, 2021

राज्यस्तरीय तेंग सूडो कराटे स्पर्धेत माहीन अय्याज राजे प्रथम

 राज्यस्तरीय तेंग सूडो कराटे स्पर्धेत माहीन अय्याज राजे प्रथम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः धुळे जिल्हयातील  पिंपळनेर येथील राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल येथे दिनांक 20 व 21 मार्च रोजी राज्यस्तरीय खुल्या तेंग सु डो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून एकूण 19 जिल्ह्यातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला सदर राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र तेंग सु डो असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आदरणीय श्री सुभाष मोहिते सर हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते त्याचप्रमाणे श्री संभाजीराव अहिरराव सर यांनी या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविले. विविध वजनगटात वयोगटात घेतल्या गेलेल्या या मुलींच्या स्पर्धेत  राज्यात अहमदनगर, जिल्ह्यानी प्रथम क्रमांक पटकाविला. राज्यस्तरीय तेंग सूडो कराटे स्पर्धेत माहीन अय्याज राजे प्रथम आला. दिनांक 21 मार्च रोजी सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या सर्व विद्यार्थ्याना संकल्प स्पोर्ट्स फाऊंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक माननीय शिहान - चंद्रकांत राहिंज सर, तसेच मास्टर वैशाली बांगर मॅडम, मास्टर योगेश वागस्कर सर, मास्टर भास्कर कावरे सर  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here