माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 15, 2021

माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

 माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर नगरपंचायत चे नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केल्या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारनेर येथील किराणा दुकानात 30 वर्षीय महिला असताना दि.14 राजी सायंकाळी 5:30च्या सुमारास टॉयटो कंपनी ची ईटोस गाडी क्र.ा ह 16 शीं 3617 या मधून चंद्रकांत रघुनाथ चेडे यानी येत काहीही न बोलता हातात दगड घेऊन वाईट वाईट व लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील शिवीगाळ करून हातातील दगड मारला तो दगड महिलेने हुकला मात्र तेथीलच लोखंडी खुर्ची ने महिलेला मारहाण केली
त्यानंतर महिलेच्या पतीने माझ्या पत्नीस मारहाण का करता असे विचारले असता चंद्रकांत चेडे यानी आमच्या किसान युनियन पतसंस्थेचे कर्ज का भरत नाही असे म्हणून महिले ला हात लावत धक्का दिला तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले दरम्यान शेजार्‍यांनी मध्यस्थी करत सोडवा सोडव केली त्यावेळी जाताना चेडे यानी महिला व तिच्या पतीस शिवीगाळ करत तुम्हाला संपवून टाकतो असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली याबाबतची फिर्याद महिलेने पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप करत आहेत.

No comments:

Post a Comment