राजेश्वरी कोठावळे यांनी घेतलेला सामाजिक उपक्रम कौतुकास्पद : आ.लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 12, 2021

राजेश्वरी कोठावळे यांनी घेतलेला सामाजिक उपक्रम कौतुकास्पद : आ.लंके

 राजेश्वरी कोठावळे यांनी घेतलेला सामाजिक उपक्रम कौतुकास्पद : आ.लंके

आ. लंके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, पारनेर तालुक्यातील जवळा येथे जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीचा उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. तालुक्यातील जवळा येथे अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांनी आमदार लंके यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून  रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी जवळा पंचक्रोशीतील  अनेक युवक व युवतींनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व दाखविले. यावेळी स्वतः आमदार निलेश लंके हे उपस्थित राहुन रक्तदात्यांचे आभार मानले. या रक्तदान शिबिरात 162 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार लंके म्हणाले की माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरा सारखा सामाजिक कार्यक्रम घेऊन राजेश्वरी कोठावळे यांनी चांगले सामाजिक काम केले आहे. कोठावळे या नेहमीच सामाजिक कामांमध्ये पुढे असतात राष्ट्रवादी युवती संघटनेच्या माध्यमातून ते चांगल्या काम करत आहेत.
राजेश्वरी कोठावळे यावेळी बोलताना म्हणाल्या की आमदार  निलेश लंके यांचे  तालुक्यात सामाजिक काम मोठे असून  त्यांच्या सामाजिक उपक्रमांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेतले आहे.  आमदार लंके यांच्या विचारांना घेऊन आम्ही नेहमीच यापुढे जनतेच्या हितासाठी सामाजिक काम करत राहू. जवळा येथे या कार्यक्रम प्रसंगी  अहमदनगर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादी माहिती-तंत्रज्ञान विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, निलेश लंके प्रतिष्ठान प्रसिद्धीप्रमुख श्रीकांत चौरे, संदीप चौधरी, माजी सरपंच किसनराव रासकर, सरपंच सुभाष आढाव, उपसरपंच गोरख पठारे, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज करखिले, मा. चेअरमन आनंदराव सालके, व्हा. चेअरमन प्रदीप सोमवंशी, संदीप शिवाजी सालके, ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ पठारे, ग्रामपंचायत सदस्य अशोक सालके, राजु लोखंडे, उद्योजक मंगेश सरोदे, शिवजी करंजुले, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब आढाव, राजु आढाव, पोपट पिसाळ, सुधीर कोठावळे, प्रदीप पठारे, तानाजी शेळके, अर्जुन पवार, पप्पू शिंदे, सुमित जासुद, संभाजी आढाव, लहू रासकर, अरुण रासकर, रमेश सालके, कैलास आढाव, रवी सरोदे, बापू वेताळ, मनोहर खोसे, सुनील लंके, मनोहर गोपाळे, तुषार सालके, अजय पठारे,  निलेश पठारे,  अक्षय पवार, श्रीकांत कोठावळे, तेजस बरशिले, उद्योजक सुधीर इंगळे, स्वाती इंगळे, माया रोकडे, वैजंता सालके, सविता थोरात, मीरा सालके, बागुल मॅडम, आदी व निलेश लंके  प्रतिष्ठानचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि  जवळा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here