आ. निलेश लंके यांचे युवकाने रेखाटले अप्रतिम व्यक्तिचित्र... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

आ. निलेश लंके यांचे युवकाने रेखाटले अप्रतिम व्यक्तिचित्र...

 आ. निलेश लंके यांचे युवकाने रेखाटले अप्रतिम व्यक्तिचित्र...

वासुंदे येथील गजानन जगदाळे यांच्या कलेचे दर्शन; आमदार लंके यांनी केले कौतुक...


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः आमदार निलेश लंके यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे आपल्या कलेच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील युवक गजानन जगदाळे यांने  आमदार लंके यांचे सुंदर असे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. हे व्यक्तिचित्र नुकतेच आमदार निलेश लंके यांना गजानन जगदाळे यांनी भेट दिले.  जगदाळे हे पुणे येथे कलाक्षेत्रात काम करत असून त्यांनी आत्तापर्यंत आपल्या कलेच्या माध्यमातून पुण्यासारख्या ठिकाणी चांगला ठसा उमटविला आहे. गुरुकुल मंडळाचे कार्याध्यक्ष गीताराम जगदाळे सर यांचे गजानन जगदाळे हे चिरंजीव आहेत. दैनिक पराक्रमीचे पारनेर प्रतिनिधी गणेश जगदाळे यांचे बंधू असून पारनेर’चे लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वर असलेल्या प्रेमामुळे जगदाळे यांनी त्यांचे सुंदर असे व्यक्तिचित्र तयार केले आहे.  
यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की गजानन ने त्याच्या कलेच्या माध्यमातून माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे जे माझे व्यक्तीचित्र तयार केले आहे ते अतिशय अप्रतिम आहे. कला क्षेत्रामध्ये गजानन ने उत्तम असे काम करावे आणि आपल्या गावचा व आई-वडिलांचा नावलौकिक वाढवावा.
   याप्रसंगी डॉ. बाबासाहेब गांगड, डॉ. उदय बर्वे, गीताराम जगदाळे सर  संपत झावरे सर, वासुंदे येथील ग्रामस्थ तसेच आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment